उन्नावमधील दही पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-कानपुर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास एआरटीओ अधिकारी प्रतिभा गौतम ओव्हरलोड वाहनांची तपासणी करत होत्या. त्यांनी हमीरपूर नंबरचा खडीने भरलेला एक डंपर पकडला. मात्र डंपरचा जीपीएस लॉक झाल्यामुळे आणि इतर चालकांनी विरोध केल्यामुळे वादाला सुरुवात झाली. याच दरम्यान एका चालकाने एआरटीओच्या गाडीची चावी काढल्याने महिला अधिकाऱ्याने त्याला कानाशिलात लगावली. वाद वाढत असल्याचं पाहून त्यांनी चालकाला आपल्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेलं आणि संबंधित डंपर जप्त केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आधी एआरटीओ प्रतिभा गौतम आणि चालकांमध्ये बाचाबाची होते. जेव्हा अधिकाऱ्याची गाडी जाऊ लागते, तेव्हा मोबाईल हिसकावल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करत चालक विरोध करतात. त्याच वेळी एक चालक मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रतिभा गौतम एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे गाडीतून उतरतात आणि त्याला जोरदार कानशिलात लगावतात. 'चालकाने दारू प्यायली आहे' असे सांगत त्या त्याला ओढत नेऊन स्वतःच्या गाडीत बसवतात.
व्हिडीओ बनवणारा तरुण, ज्याने आपले नाव गोलू असल्याचं सांगितलं, तो वारंवार म्हणत होता की, "मॅडम तुम्ही चुकीचं करत आहात." त्याने दावा केला की त्याचे यूट्यूबवर ५ लाख फॉलोअर्स आहेत आणि या वर्तणुकीबद्दल महिला अधिकाऱ्याला माफी मागावी लागेल. घटनास्थळी उपस्थित चालकांचा असा आरोप होता की, पकडलेल्या डंपरमुळे त्यांचा रस्ता अडवला जात होता आणि विरोध केल्यावर त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं.
१२ नोव्हेंबर २०२५ रोजी एटीएसने बेकायदेशीर वसुलीच्या प्रकरणात ज्या आरटीओ आणि एआरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता, त्यात प्रतिभा गौतम यांचंही नाव होतं. या घटनेवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, "डंपरचा जीपीएस खराब झाल्यामुळे ट्रॅफिकजाम झालं होतं. तिथे उपस्थित चालकांनी गोंधळ घातला आणि एका मद्यधुंद चालकाने सरकारी गाडीची चावी काढली, त्यामुळे मला हस्तक्षेप करावा लागला." त्यांनी हायड्रा मशीन बोलावून वाहन हटवलं आणि कायदेशीर कारवाई केली.
Web Summary : An ARTO officer in Unnao slapped a driver for allegedly removing her car key during an argument over an overloaded truck. A bystander with a large social media following demanded an apology. The ARTO claims the driver was drunk and caused a traffic jam.
Web Summary : उन्नाव में एक एआरटीओ अधिकारी ने ओवरलोड ट्रक पर बहस के दौरान कथित तौर पर कार की चाबी निकालने पर एक ड्राइवर को थप्पड़ मार दिया। एक दर्शक, जिसके सोशल मीडिया पर बड़ी संख्या में फॉलोअर्स हैं, ने माफी की मांग की। एआरटीओ का दावा है कि ड्राइवर नशे में था और उसने ट्रैफिक जाम किया।