भांडण झाले, पतीने छतावरून उडी मारली, पत्नीनेही वाचवायला उडी मारली, पती वाचला,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 17:09 IST2022-12-09T17:08:52+5:302022-12-09T17:09:06+5:30

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊमध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला. पतीने रागाच्या भरात छतावरून उडी मारली.

lucknow man jumped from the roof after dispute wife also jumped died | भांडण झाले, पतीने छतावरून उडी मारली, पत्नीनेही वाचवायला उडी मारली, पती वाचला,पण...

भांडण झाले, पतीने छतावरून उडी मारली, पत्नीनेही वाचवायला उडी मारली, पती वाचला,पण...

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊमध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला. पतीने रागाच्या भरात छतावरून उडी मारली. पतीला वाचवण्यासाठी पत्नीनेही छतावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पती वाचला आहे. तर पत्नीचा मृत्यू झाला आहे. या दांपत्याला दोन मुले आहेत.

हे प्रकरण लखनऊच्या अमिनाबाद परिसरातील आहे. पतीचे नाव संदीप शर्मा आणि पत्नीचे नाव रोली शर्मा आहे. संदीपचे चाट-पकोरीचे दुकान आहे. ८ डिसेंबर रोजी पती संदीप मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला होता. पत्नीशी काही गोष्टीवरून वाद झाला. वाद वाढत गेल्यावर पत्नीने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी काही वेळात घटनास्थळ गाठून दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, पती छतावर गेला आणि, पोलिसांसमोरच छतावरून उडी मारली. पतीला वाचवण्यासाठी पत्नेनीही उडी मारली. दोघांनाही तडकाफडकी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पत्नीला मृत घोषित करण्यात आले असून पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पती झाला हैवान! शेजाऱ्याकडे टोमॅटो मागितला म्हणून पत्नीला दिली भयंकर शिक्षा, झालं असं काही...

या दाम्पत्यांमध्ये दुपारपासून वाद सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यापूर्वीही अनेकदा यांच्यात वाद व्हायचे.

Web Title: lucknow man jumped from the roof after dispute wife also jumped died