शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडिता आत्मदहन: माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 22:08 IST

Lucknow former IPS amitabh thakur arrested : फेसबुक लाईव्हमध्ये तिने वाराणसीचे तत्कालीन एसएसपी अमित पाठक, तत्कालीन सीओ भेलूपुर अमरेश सिंह बघेल, निरीक्षक संजय राय आणि इतरांवर खासदारांना वाचवण्याचा आणि त्रास देण्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देयापूर्वी मंगळवारी तपास समितीने माजी आयपीएस अमिताभ ठाकूर आणि आयपीएस अमित पाठक यांची चौकशी केली होती. या तपास समितीमध्ये डीजी आरके विश्वकर्मा आणि एडीजी मीरा रावत यांचा समावेश आहे.

लखनऊ - माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना लखनऊ पोलिसांनी बलात्कार पीडितेला आत्मदहन करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. एसआयटीच्या तपासाच्या अहवालाच्या आधारे माजी आयपीएसवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

यापूर्वी मंगळवारी तपास समितीने माजी आयपीएस अमिताभ ठाकूर आणि आयपीएस अमित पाठक यांची चौकशी केली होती. या तपास समितीमध्ये डीजी आरके विश्वकर्मा आणि एडीजी मीरा रावत यांचा समावेश आहे. बसपाचे खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या मुलीने आपल्या एका साथीदारासह सर्वोच्च न्यायालयाच्या गेटबाहेर आत्मदहन केले होते. आत्मदहनाच्या अगोदर, फेसबुक लाईव्ह करत असताना, तिने उत्तर प्रदेशच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह इतर काही लोकांना त्रास देण्याचा आणि दबाव आणण्याचा आरोप केला होता. नंतर उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. वास्तविक बलियाची रहिवासी असलेल्या पीडिता वाराणसीतील एका कॉलेजची विद्यार्थिनी होती. फेसबुक लाईव्हमध्ये तिने वाराणसीचे तत्कालीन एसएसपी अमित पाठक, तत्कालीन सीओ भेलूपुर अमरेश सिंह बघेल, निरीक्षक संजय राय आणि इतरांवर खासदारांना वाचवण्याचा आणि त्रास देण्याचा आरोप केला होता.

अमिताभ ठाकूर कोण आहेत?१९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर हे मूळचे बिहारचे आहेत. त्यांची कारकीर्द अनेक वादांनी घेरली गेली. ते अनेक जिल्ह्यात एसपी होते. अमिताभ ठाकूर हे राष्ट्रीय माहिती अधिकार फोरमचे संस्थापकही राहिले आहेत. त्याची पत्नी देखील एक सामाजिक कार्यकर्ता आहे. २०१५ मध्ये अमिताभ ठाकूर यांनी माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. सेवेत असताना ते सरकारविरोधात आवाज उठवत राहिले. त्याच वर्षी त्यांना जबरदस्तीने निवृत्त करण्यात आले. काही दिवसांनी अमिताभ ठाकूर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशFacebookफेसबुकDeathमृत्यू