उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सध्या एका थरारक हत्याकांडामुळे चर्चेत आहे. एका मुलाने आपल्याच वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या रंगाच्या ड्रममध्ये लपवून ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा केल्यानंतर त्याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी तपास चक्र फिरवल्यानंतर घरातूनच निळ्या ड्रममध्ये वडिलांचा छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता शेजाऱ्यांनीही आरोपी मुलाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अक्षत अनेकदा वडिलांची बंदूक घेऊन घरात फिरत असे. कधीकधी तो ती बंदूक कारमध्ये घेऊन बाहेरही जात असे. घरात तो सतत बंदूक साफ करणं आणि निशाणा धरण्याचा सराव करायचा. तो कधी गोळीबार करताना दिसला नसला तरी त्याच्या हालचालींवरून तो बंदुकीच्या वापरात सराईत असल्याचं जाणवत होतं. तो बंदुकीचे सुटे भाग करून पुन्हा जोडण्यात माहीर होता. कधीकधी तो परिसरातही बंदूक दाखयचा, त्यामुळे परिसरातील मुलं त्याच्यापासून लांबच राहत असत.
लखनौच्या आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मानवेंद्र सिंह २० फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. पदवीचं शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा अक्षत यानेच २० फेब्रुवारीला त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याने सुरुवातीला पोलिसांना सांगितलं की, २० फेब्रुवारीच्या पहाटे ६ वाजता वडिलांनी त्याला उठवलं आणि ते दिल्लीला जात असल्याचे सांगून निघाले. मात्र त्यानंतर त्यांचे तिन्ही मोबाईल बंद झाले.
तपासादरम्यान मानवेंद्र सिंह यांचे शेवटचं लोकेशन काकोरीमध्ये आढळले, पण तिथे मोबाईल सापडला नाही. पोलिसांचा संशय मुलावर बळावला आणि त्यांनी अक्षतची कसून चौकशी केली. चौकशीत तो वारंवार आपले जबाब बदलत होता. अखेर त्याने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. अक्षतने पोलिसांना सांगितलं की, २० फेब्रुवारीच्या पहाटे साडेचार वाजता वडिलांशी त्याचा कडाक्याचा वाद झाला.
रागाच्या भरात त्याने परवानाधारक बंदूक काढून वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिसऱ्या मजल्यावरून मृतदेह खाली आणला आणि त्याचे तुकडे केले. काही भाग त्याने कारमध्ये नेऊन सदरौना भागात फेकून दिले, तर उर्वरित धड एका निळ्या ड्रममध्ये भरून घरातच लपवून ठेवले. सोमवारी सायंकाळी पोलीस अक्षतला घेऊन त्याच्या घरी पोहोचले, जिथे ड्रममध्ये मानवेद्र सिंह यांचा अर्धवट कापलेला मृतदेह आढळला. या घटनेमुळे त्याची लहान बहीण इतकी घाबरली होती की तिने कोणालाही काहीच सांगितले नाही.
Web Summary : In Lucknow, a son murdered his father, dismembered the body, and hid it in a drum. He then reported his father missing. Neighbors revealed the son often practiced with a gun, raising suspicions before his confession.
Web Summary : लखनऊ में एक बेटे ने अपने पिता की हत्या कर दी, शव को टुकड़ों में काटा और एक ड्रम में छिपा दिया। फिर उसने अपने पिता के लापता होने की सूचना दी। पड़ोसियों ने खुलासा किया कि बेटा अक्सर बंदूक से अभ्यास करता था, जिससे उसकी स्वीकारोक्ति से पहले ही संदेह बढ़ गया।