उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून आयएसआय (ISI) शी संबंधित ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे लखनऊ रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेचे सिग्नल बॉक्स उडवून देण्याच्या तयारीत होते. सुरुवातीच्या चौकशीत यूपी एटीएसला अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मेरठचा रहिवासी असलेला साकिब उर्फ डेविल हा थेट 'आयएसआय' हँडलरच्या संपर्कात होता. पाकिस्तानमध्ये बसलेला आयएसआय हँडलर साकिबला थेट फंडिंग करत होता. साकिबच्या माध्यमातूनच गँगमधील उर्वरित ३ सदस्यांना पैसे पुरवले जात होते, असा दावाही केला जात आहे.
एटीएसने असाही दावा केला आहे की, आरोपींनी लखनौ, गाझियाबाद आणि मेरठमधील अनेक महत्त्वाची ठिकाणं आणि गाड्यांच्या शोरूमचे व्हिडीओ व फोटो बनवून पाकिस्तानात पाठवले होते. आरोपींचा गॅस सिलिंडरने भरलेले ट्रक आणि गाड्यांच्या शोरूममध्ये आग लावण्याचाही कट होता.
सिग्नल जाळून रेल्वे अपघाताचा कट
पाकिस्तानमध्ये बसलेला आयएसआय हँडलर गुगल लोकेशनचं 'स्क्रीन रेकॉर्डिंग' करून साकिबला पाठवायचा आणि त्यानंतर त्या ठिकाणचे फोटो व व्हिडीओ पाकिस्तानी हँडलरला परत पाठवले जायचे. रेल्वे सिग्नल बॉक्स जाळून रेल्वे वाहतूक विस्कळीत करणं आणि मोठा रेल्वे अपघात घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.
साथीदारांना देत होता चिथावणी
पाकिस्तानमधील हँडलर ओसामा बिन लादेन, फरहतुल्ला गौरी, काश्मीर मुजाहिद्दीन आणि 'गझवा-ए-हिंद'च्या नावाने साकिब आणि त्याच्या साथीदारांना चिथावणी देत होता. साकिब उर्फ डेविलचे सोशल मीडियावर शस्त्रास्त्रांसह व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून लोकेश उर्फ पपला आणि विकास उर्फ रौनक त्याच्या संपर्कात आले होते.
पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात
साकिबसोबत अरबाब हा देखील पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात आला होता. सध्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या या चारही आरोपींना यूपी एटीएस रिमांडवर घेणार आहे. रिमांडबाबत आज विशेष न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
Web Summary : Four ISI suspects arrested in Lucknow planned to blow up a railway signal box. They received funding from Pakistan and sent photos of key locations. The suspects aimed to disrupt rail traffic and cause a major accident with guidance from handlers who promoted extremist ideologies.
Web Summary : लखनऊ में रेलवे सिग्नल बॉक्स उड़ाने की साजिश नाकाम, ISI से जुड़े 4 संदिग्ध गिरफ्तार। पाकिस्तान से फंडिंग और चरमपंथी विचारधाराओं के साथ, उन्होंने महत्वपूर्ण स्थानों की तस्वीरें भेजीं और रेल यातायात को बाधित करने और दुर्घटना का कारण बनने की योजना बनाई।