दिराचं झालं अपहरण, आरोपीकडून नवरीची करण्यात आली मागणी; नंतर झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 10:11 IST2022-11-12T10:10:57+5:302022-11-12T10:11:30+5:30

Lover Kidnapped Brother Of Groom: एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या लग्नामुळे नाराज होऊन प्रेयसीच्या दिराचं अपहरण केलं आणि मग....

Lover kidnapped brother of groom and demand for bride police arrested him | दिराचं झालं अपहरण, आरोपीकडून नवरीची करण्यात आली मागणी; नंतर झाला धक्कादायक खुलासा

दिराचं झालं अपहरण, आरोपीकडून नवरीची करण्यात आली मागणी; नंतर झाला धक्कादायक खुलासा

Lover Kidnapped Brother Of Groom: उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यातून एक अजब प्रेम कहाणी समोर आली आहे. इथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या लग्नामुळे नाराज होऊन प्रेयसीच्या दिराचं अपहरण केलं आणि मग दिराला परत पाठवण्याच्या बदल्यात आपल्या प्रेयसीला मागितलं. त्यानंतर जे झालं त्याची सध्या चर्चा रंगली आहे.

हे सगळं प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. नंतर पोलिसांनी अटकही केली. मीडिया रिपोर्टनुसार, साधारण सहा महिन्याआधी गोलू नावाच्या तरूणाचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. त्यांची भेट एका नातेवाईकच्या घरातील लग्नात झाली होती. नंतर दोघेही फोनवर बोलू लागले होते.

पण अचानक आला ट्विस्ट

काही दिवसांनी एका कारणावरून तरूणी रागावली आणि ती तरूणाचा मामेभाऊ उमेश याच्यासोबत फोनवर बोलणं सुरू केलं. इतकंच नाही तर उमेशसोबत तिचं लग्नही ठरलं. घरातील लोकही या लग्नासाठी तयार होते. दोन महिन्यांआधी त्यांचं लग्नही झालं. यानंतर गोलू संतापला आणि आपल्या प्रेयसीला परत मिळवण्यासाठी नवरदेवाचा लहान भाऊ म्हणजेच गोलूने त्याच्याच मामेभावाचं अपहरण केलं. त्याने त्याला परत करण्याच्या बदल्यात प्रेयसीची मागणी केली.

यानंतर एकच गोंधळ उडाला. उमेश जेव्हा नातेवाईकांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा त्याने पोलिसांना सगळी घटना सांगितली. पोलिसांनी कारवाई करत गोलूच्या दोन साथीदारांना पकडून नवरदेवाच्या भावाला सुखरूप सोडवलं. अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी तुरूंगात टाकलं. त्यानंतर मुख्य आरोपी गोलूनेही सरेंडर केलं. 

Web Title: Lover kidnapped brother of groom and demand for bride police arrested him