एक्स-बॉयफ्रेंडने लग्न करण्यास दिला होता नकार, मग नव्या बॉयफ्रेंडसोबत मिळून केली त्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 18:02 IST2023-05-08T18:00:39+5:302023-05-08T18:02:42+5:30

Crime News : 27 वर्षीय निलेश इशाकच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यावर पोलिसांना समजलं की, निलेशची हत्या गळा दाबून करण्यात आली होती.

Lover girl friend new boyfriend killed old boyfriend deadbody found canal chhotaudepur Gujarat | एक्स-बॉयफ्रेंडने लग्न करण्यास दिला होता नकार, मग नव्या बॉयफ्रेंडसोबत मिळून केली त्याची हत्या

एक्स-बॉयफ्रेंडने लग्न करण्यास दिला होता नकार, मग नव्या बॉयफ्रेंडसोबत मिळून केली त्याची हत्या

Crime News : गुजरातच्या छोटा उदयपूर जिल्ह्यात एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. असं सांगण्यात आलं की, तरूणाची हत्या करून त्याचा मृतदेह कॅनलमध्ये फेकण्यात आला होता. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमला पाठवण्यात आला. तरूण हा दुमाली गावातील निलेश इशाक असल्याचं समजलं.

27 वर्षीय निलेश इशाकच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यावर पोलिसांना समजलं की, निलेशची हत्या गळा दाबून करण्यात आली होती. नंतर त्याचा मृतदेह फेकण्यात आला. मृतकाच्या परिवाराने सांगितलं की, जवळच्या गावात राहणाऱ्या श्रेयस उर्फ अप्पु सोनी आणि जया राठवा यांनी त्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती.

कुटुंबियांच्या जबाबानंतर पोलिसांनी जया राठवा आणि अप्पु सोनी यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. आधी तर दोघांनी काही सांगितलं नाही. पण नंतर कसून चौकशी केल्यावर त्यांनी हत्येचा गुन्हा कबूल केला. जया राठवाने पोलिसांना सांगितलं की, ती 8 वर्ष निलेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण निलेश लग्नासाठी टाळाटाळ करत होता. यादरम्यान तिची भेट अप्पु सोनीसोबत झाली आणि दोघांचं अफेअर सुरू झालं. नंतर दोघांनी मिळून निलेशच्या हत्येचा प्लान केला.

जयाने पोलिसांना सांगितलं की, प्लाननुसार तिने निलेशला भेटवण्यासाठी बोलवलं आणि कारमध्ये बसवून त्याच्यासोबत बोलत होती. संधी मिळताच अप्पु सोनी आणि तिने कारच्या सीट बेल्टने निलेशचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह फेकला. त्यानंतर ती मुंबईला गेली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

Web Title: Lover girl friend new boyfriend killed old boyfriend deadbody found canal chhotaudepur Gujarat