घरातून पळालं, विष खाल्लं अन् कसं-बसं पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं प्रेमी युगुल, सगळेच झाले हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 14:44 IST2021-03-04T14:42:22+5:302021-03-04T14:44:32+5:30
प्रेमी युगुलाची झडती घेतली तर त्यांच्याकडे सुसाइड नोट आढळून आली. ज्यात लग्नाला परिवाराची परवानगी नसल्याने ते विष पिऊन आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता.

घरातून पळालं, विष खाल्लं अन् कसं-बसं पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं प्रेमी युगुल, सगळेच झाले हैराण...
लखनौच्या जानकीपूरम पोलीस स्टेशन परिसरातील एक प्रेम प्रकरणाशी संबंधित अजब घटना समोर आली आहे. इथे अर्धशुद्धी अवस्थेत बुधवारी एक प्रेमी युगुल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. दोघांची गंभीर स्थिती पाहून पोलीसही हैराण झाले होते. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी सांगितले की, आता त्यांची तब्येत बरी आहे. दोघांकडेही वेगवेगळ्या सुसाइड नोट सापडल्या.
तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जानकीपुरम पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक ब्रिजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, गेल्या मंगळवारी रात्री जानकीपूरम येथे राहणाऱ्या तरूणीच्या वडिलांनी सेक्टर-सीमध्ये राहणाऱ्या शाहरूख नावाच्या तरूणावर आपल्या मुलीला फसवून पळून नेण्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचाही शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दोघांची पत्ता काही लागला नाही. पोलीस टीम पुढील योजना करत होतेच की, शाहरूखच्या कुटुंबियांचा पोलिसांना फोन आला आणि तो पोलीस स्टेशनला येत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने दोघेही कसेबसे पोलीस स्टेशनला पोहोचले. (हे पण वाचा : तुरूंगात बिनधास्त आहे शबनमचा प्रेमी सलीम, म्हणाला - 'परेशान होऊ नका, या देशात लवकर देत नाही फाशी')
लग्नाविरोधात होते दोन्ही परिवार
पोलिसांना प्रेमी युगुलाने सांगितलेकी, ते दोघेही वयस्क आहेत आणि दोघांनाही एकमेकांशी प्रेम विवाह करायचा आहे. पण परिवारातील लोकांची यासाठी साथ नाही. प्रेमी युगुलाची झडती घेतली तर त्यांच्याकडे सुसाइड नोट आढळून आली. ज्यात लग्नाला परिवाराची परवानगी नसल्याने ते विष पिऊन आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. बघता बघता दोघांची तब्येत गंभीर झाली. ज्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हे पण वाचा : चुलत भावासोबत होते तरुणीचे संबंध, वडिलांनी आक्षेपा्र्ह अवस्थेत पाहिले आणि....)
विष पिऊन पोलिसांकडे आले...
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोघांनी धान्यात ठेवलं जाणारं औषध खाल्लं होतं. ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. वेळीच त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्याने दोघेही ठीक आहेत. पोलिसांनी सांगितले की, दोघांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच त्यांचे वयस्क असल्याचे कागदपत्र तपासूनच नंतर पुढील निर्णय घेतला जाईल.