प्रेम केलं, लग्न झालं अन् तुरुंगात जावं लागलं; गर्लफ्रेंडच्या मार्कशीटने बिघडवला खेळ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 16:42 IST2024-01-20T16:41:57+5:302024-01-20T16:42:39+5:30

एका तरुणाची फेसबुकवर एका मुलीशी मैत्री झाली, मैत्रीनंतर ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि प्रेमानंतर दोघांनी लग्न केलं.

loved got married now had to go to jail girlfriend mark sheet spoiled whole game | प्रेम केलं, लग्न झालं अन् तुरुंगात जावं लागलं; गर्लफ्रेंडच्या मार्कशीटने बिघडवला खेळ अन्...

प्रेम केलं, लग्न झालं अन् तुरुंगात जावं लागलं; गर्लफ्रेंडच्या मार्कशीटने बिघडवला खेळ अन्...

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची फेसबुकवर एका मुलीशी मैत्री झाली, मैत्रीनंतर ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि प्रेमानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र यानंतर मुलीच्या एका सर्टिफिकेटमुळे तरुणाला थेट जेलमध्ये जावं लागलं आहे. 

पंजाबच्या लुधियानाचा रहिवासी असलेल्या तरुणाला फेसबुकवरील प्रेमामुळे तुरुंगात जावं लागलं आहे. कारण त्याने ज्या मुलीशी लग्न केलं होतं ती अल्पवयीन होती. तरुणाची फेसबुकवर पाच महिन्यांपूर्वी या मुलीशी भेट झाली होती. दोघांमधील संवाद वाढला आणि पुढे त्याचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर तरुणाने मुलीशी लग्न देखील केलं. 

मुलीच्या वडिलांनी या घटनेनंतर फतेहपूर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तक्रार दाखल करून अज्ञात तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर फतेहपूर पोलिसांनी एक टीम तयार करून दोघांचा शोध घेतला. पोलिसांना या दोघांना शोधण्यात यश मिळालं. 

फतेहपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सत्येंद्र कुमार राय यांनी सांगितले की, तरुणाने फेसबुकवर मुलीसोबत ओळख झाल्याचं सांगितलं. नंतर त्याने लग्नाचं आमिष दाखविल्याची कबुली दिली आहे. मुलीच्या सर्टिफिकेटनुसार ती अल्पवयीन आहे, त्यामुळे तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

Web Title: loved got married now had to go to jail girlfriend mark sheet spoiled whole game