लव्ह, सेक्स आणि धोका! मुंबई पोलीस चक्क बनले डिलेव्हरी बॉय अन् आवळल्या आरोपीच्या मुसक्या

By पूनम अपराज | Updated: October 10, 2020 21:09 IST2020-10-10T21:07:56+5:302020-10-10T21:09:06+5:30

Rape : अंधेरीमधील हेल्थ क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत मोहम्मद अनिस उर्फ मोहम्मद शौकत नावाच्या इसमाने मैत्री केली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. नंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करायचे ठरविले.

Love, sex and danger! Mumbai Police became a delivery boy and arrested the accused | लव्ह, सेक्स आणि धोका! मुंबई पोलीस चक्क बनले डिलेव्हरी बॉय अन् आवळल्या आरोपीच्या मुसक्या

लव्ह, सेक्स आणि धोका! मुंबई पोलीस चक्क बनले डिलेव्हरी बॉय अन् आवळल्या आरोपीच्या मुसक्या

ठळक मुद्दे आरोपी मोहम्मद अनिस याने महिलेशी स्नॅप चॅट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक केली. गोरेगाव येथे लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. त्यावेळी तिचे आक्षेपार्ह फोटो देखील काढले.

पहिल्यांदा मैत्री, नंतर प्रेम आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना मुंबईत घडली आहे. या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस चक्क डिलेव्हरी बॉय बनले होते हे विशेष. जे . जे. मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अंधेरीमधील हेल्थ क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत मोहम्मद अनिस उर्फ मोहम्मद शौकत नावाच्या इसमाने मैत्री केली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. नंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करायचे ठरविले. आरोपी महिलेच्या घरच्यांना देखील भेटला आणि त्यांना देखील लग्न करण्याचं आमिष दाखवलं. मात्र, आमिष अमिशाच राहील. लग्नाचं आमिष दाखवून पीडित महिलेवर मोहम्मद अनिसने वारंवार बलात्कार केला. याबाबत २८ वर्षाच्या महिलेने तक्रार दाखल केली होती. 

आरोपी मोहम्मद अनिस याने महिलेशी स्नॅप चॅट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक केली. गोरेगाव येथे लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. त्यावेळी तिचे आक्षेपार्ह फोटो देखील काढले. नंतर पंजाबमधील मल्हरपेठचा राहणारा आरोपी तिथे गेल्यावर तिला ब्लॅकमेल करू लागला. ब्लॅकमेल करून त्याने तिच्याकडून ५ लाख रुपये उकळले. नंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. जे. जे. मार्ग पोलिसांनी आरोपीवर सोशल मीडिया आणि मोबाईलच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधला असता तो पंजाब नाही तर बंगळुरू येथे असल्याची माहिती मिळाली. मुंबई पोलिसांचे पथक बंगळुरू येथे दाखल झालं. एका उच्चभ्रू इमारतीत आरोपी राहत होता आणि त्याला ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय होती. उच्चभ्रू इमारतीत प्रवेश मिळवणं पोलिसांना थोडं अवघड होतं. तसेच आरोपीला सुगावा लागेल म्हणून इमारतीबाहेर पोलिसांचे पथक पोहचले. एपीआय खान आणि त्यांच्या पथकाने डिलेव्हरी बॉय बनून इमारतीत प्रवेश केला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

Web Title: Love, sex and danger! Mumbai Police became a delivery boy and arrested the accused