मोलकरणीच्या प्रेमात 'त्याने' आई-वडिलांसह, बहिण अन् पत्नीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:25 PM2020-05-20T13:25:17+5:302020-05-20T13:26:40+5:30

या हत्येबाबत सांगताना पोलिसांनी माहिती दिली की, मोलकरणी सोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे आतिषने कुटुंबातील आई, वडील, बहीण आणि पत्नी यांची हत्या करण्यात आली आहे.

In love with a maid, he killed his sister and wife along with his parents pda | मोलकरणीच्या प्रेमात 'त्याने' आई-वडिलांसह, बहिण अन् पत्नीची केली हत्या

मोलकरणीच्या प्रेमात 'त्याने' आई-वडिलांसह, बहिण अन् पत्नीची केली हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आतिष घरी परतला असता वडील तुलसीदास केसरवानी (६४), आई किरण (६०), बहीण निहारिका (३०) आणि पत्नी प्रियंका (२७) यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहिले.८ लाखांपैकी ७५ हजार रुपये आतिशने दिले होते. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना चाकूने गळा आवळून खून करण्यात आला.

प्रयागराज - लॉकडाऊनमध्ये गुरुवारी एकाच कुटुंबातील चार सदस्यांची गळा दाबून हत्या हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय आतिष केसरवानी आणि त्याचा साथीदार मुलगा अनुज याला अटक केली आहे. इतर दोन आरोपी फरार आहेत. या हत्येबाबत सांगताना पोलिसांनी माहिती दिली की, मोलकरणी सोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे आतिषने कुटुंबातील आई, वडील, बहीण आणि पत्नी यांची हत्या करण्यात आली आहे.

गेल्या गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आतिष घरी परतला असता वडील तुलसीदास केसरवानी (६४), आई किरण (६०), बहीण निहारिका (३०) आणि पत्नी प्रियंका (२७) यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. एकाच कुटुंबातील चार जणांना ठार मारल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळावरील चौकशीत आतिशने सांगितलं की, तो बँकेत गेला होता. दुपारी घरी परत आला तेव्हा सर्वजणांचा मृतदेह पाहून धक्का बसला आहे.

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक



वरिष्ठ पोलीस अधीक्षक सत्यर्थ अनिरुद्ध पंकज यांनी आरोपी आतिषची ओळख पातळी असून तो प्रीतम नगरचा रहिवाशी असल्याचे सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुरकु वेंकट अशोक यांनी सांगितले की, आतिष आणि त्याचा मित्र अनुपने दोन आठवड्यांपूर्वी या सामूहिक हत्येचा कट रचला. आतिशने ८ लाखांची सुपारी मित्र अनुप, त्याचे काका बच्चा श्रीवास्तव आणि अजून एकाला दिली. ८ लाखांपैकी ७५ हजार रुपये आतिशने दिले होते. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना चाकूने गळा आवळून खून करण्यात आला.


कुटुंबियांच्या हत्येचा कट मुलाने का रचला  
काही दिवसांपूर्वी घरात काम करणाऱ्या मोलकरणीशी अनैतिक संबंधाबाबत घरात वादविवाद झाला होता. यानंतर आतिषने त्याचा मित्र अनुज श्रीवास्तव यांच्यासह हत्येचा कट रचला. अनुजमार्फतच भाडोत्री माणसांना बोलवण्यासाठी ८ लाखांची सुपारी देण्यात आली. या हत्येमध्ये एकूण चार जणांचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आतिष आणि अनुज यांना अटक केली आहे. तर हा हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पाच पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: In love with a maid, he killed his sister and wife along with his parents pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.