शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन मैत्रीनंतर बहरले प्रेम, नंतर न्यूड व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:49 IST

Nude Video And Blackmailing : प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षाची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नामक आरोपी सोबत तिची गेल्यावर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती.

नागपूर : बारावीतील एका विद्यार्थिनीने स्नॅप चॅट वर एका तरुणाशी मैत्री केली. तो कुठला आहे, कसा आहे, याचा आतापता नसताना त्यांची मैत्री झाली अन् मैत्रीनंतर त्यांच्यातील ऑनलाइन प्रेमही बहरले. ते एवढे पुढे गेले की तिने त्याला आपले न्यूड व्हिडिओ पाठवले. आता त्याचे काम संपले अन् तिची डोकेदुखी वाढली. तिचे हेच व्हिडिओ आता तिच्यासाठी अस्वस्थतेचे कारण ठरले आहे.

प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षाची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नामक आरोपी सोबत तिची गेल्यावर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. नंतर या दोघांचे ऑनलाइन प्रेम प्रकरण बहरले. ते सलग एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. तिने त्याला स्वतःचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर त्याची डिमांड वाढतच गेली. त्यामुळे युवतीने त्याला टाळने सुरु केले. त्यामुळे आरोपी रितिक ब्लॅकमेलिंगवर उतरला. ते पाहून तिने त्याच्याशी बातचीत बंद केली, त्याला ब्लॉक केले. त्यामुळे तो खवळला. आरोपी रीतीकने तिच्या मोबाईलमधील संपर्कात असलेले सर्व नंबर काढून त्यातील एका जवळच्या व्यक्तीला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले. त्याला फोन करून तिला बोलायला सांग, नाही तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. नातेवाइकांने हा व्हिडीओ तिला दाखवून विचारणा याबाबत केली. तिच्या आई वडिलांनाही हा प्रकार सांगितला. प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे युवतीने माणकापुर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. ठाणेदार वैयंती मांडवधरे यांनी आरोपी रितिकविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.आरोपी ओडिशातील रहिवासीपोलिसांनी आरोपीच्या आयपी वरून त्याचा एड्रेस शोधला असता तो ओडिशा मधील रहिवासी असल्याचे उघड झाले. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनPoliceपोलिसnagpurनागपूर