कर्जबाजारी तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:12 IST2019-03-11T18:11:14+5:302019-03-11T18:12:49+5:30
या तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

कर्जबाजारी तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई - मंत्रालयाच्या गार्डन गेटवर सोन्या - चांदीच्या व्यापारात कर्जबाजारी झाल्याकारणाने विनायक बाळासाहेब वेदपाठक (२७) यांनी आज दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विनायक वेदपाठक याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले म्हणून अनर्थ टळला. या तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
विनायक हा उस्मानाबाद येथील कळंबमधील सोनारगल्लीत राहणारा असून त्याने कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. मात्र, मंत्रालयासमोर बेरोजगार तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरूणाचे नाव समजलेले नाही. मात्र रोजगार न मिळाल्याने या तरूणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सरकारविरोधात निषेध नोंदविला आहे.
मंत्रालयासमोर बेरोजगार तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही बाब दुर्दैवी आहे. वर्षाला २ कोटी रोजगार देतो म्हणून सुशिक्षित तरुणांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! तरुणांनो आत्महत्या करू नका, तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सरकारला धडा शिकवा. pic.twitter.com/GMJhqFkUAX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 11, 2019