उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात पोलिसांनी चकमकीत मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्या आहेत. आरोपीच्या दोन्ही पायात गोळी लागली आहे. आरोपी तरुणाने तीन दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. यावर तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबले, त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला.17 एप्रिल रोजी सकाळी चरवा पोलीस ठाणे हद्दीतील चिल्ला शाहबाजी गावातील झुडपात मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या तपासात आरोपी तरुणाचे नाव समोर आले. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी तरुण प्रयागराज येथून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर पोलिसांसोबत त्याची चकमक झाली आणि त्याच्या दोन्ही पायात गोळी लागली.काय आहे संपूर्ण प्रकरण?करारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आड़हरा गावातील तरुणीला घरातील लोकांचा राग अनावर झाला होता. 16 एप्रिल रोजी ती घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेच न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी करारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मुलगी आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी पायी निघाली होती.आरोपी राजेंद्रने मुलीला लिफ्ट दिली. मुलगी त्याच्यासोबत दुचाकीवर बसली. अंधारामुळे राजेंद्रने तिला चिल्ला शाहबाजी गावाजवळील बागेत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावर तरुणीने आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबले. गुदमरल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.
लिफ्ट, बलात्काराचा प्रयत्न, खून आणि चकमक... यूपी पोलिसांनी आरोपीच्या पायावर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:14 IST