Video : जीवघेणी स्टंटबाजी! अल्पवयीन मुलांचा लोकलमधील स्टंट वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:42 IST2019-05-11T19:40:40+5:302019-05-11T19:42:31+5:30
अल्पवयीन मुलांनी लोकलमध्ये लोंबकळत जीवघेणा स्टंट केला आहे.

Video : जीवघेणी स्टंटबाजी! अल्पवयीन मुलांचा लोकलमधील स्टंट वायरल
मुंबई - अलीकडे लोकलमध्ये केले जाणारे जीवघेणे स्टंट सोशल मीडियावर वायरल होतात. नंतर संबंधितांवर कारवाईचा बडगा पोलीस उचलतात. तरीदेखील स्टंटबाजांची मर्कटलीला थांबता थांबत नाही आहेत. नुकताच एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. शिवडी हार्बर रेल्वे स्थानकादरम्यान अल्पवयीन मुलांनी लोकलमध्ये लोंबकळत जीवघेणा स्टंट केला आहे.
या व्हिडिओत शिवडी रेल्वे स्थानक येण्याआधी एक तरुण जीवघेणा मर्कटलीला करतो. धावत्या लोकलमधून लोकलच्या दरवाज्याबाहेर संपूर्ण शरीर बाहेर लोंबकळून खाली झुकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवडी रेल्वे स्थानक आल्यानंतर दुसरा तरुण देखील त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे मर्कटलीला करू लागला. रेल्वे प्रशासनाने अशा स्टंटबाजांविरोधात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी नागरिक सतत करत असतात. रेल्वे यात्री परिषद देखील अशा जीवघेणा स्टंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे. तसेच करोडो रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही देखील अशा स्टंटबाजांना आळा बसविण्यासाठी कुचकामी ठरल्याचे रेल्वे यात्री परिषद सांगत आहे.