शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 15:16 IST

बांभोरी पुलाजवळ अपघात, पोलीस कर्मचाऱ्याकडे द्वारदर्शनाला जाताना घडली दुर्घटना

ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील यांच्या आईचे निधन झालेले आहे.दुर्गादासगिरी मधुकर गोसावी (वय-३७, रा. पाचोरा) हे पोलीस दलातील विधी अधिकारी जागीच ठार झाले तर संदीप भीकन पाटील (३५,रा.पोलीस लाईन) हा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

जळगाव - खराब रस्ते, समांतर रस्त्याचा अभाव यामुळे महामार्गावर सातत्याने अपघात होत असून नागरिकांचा रोष वाढतच चालला आहे. दोन दिवसापूर्वी महामार्गावर अजिंठा चौकाजवळ येवल्याच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा महामार्गावर बांभोरी पुलाजवळ खराब रस्त्यामुळे वाहनाचा कट लागून दुर्गादासगिरी मधुकर गोसावी (वय-३७, रा. पाचोरा) हे पोलीस दलातील विधी अधिकारी जागीच ठार झाले तर संदीप भीकन पाटील (३५,रा.पोलीस लाईन) हा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सकाळी साडे आठ वाजता हा अपघात झाला. 

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनिल पाटील यांच्या आईचे निधन झालेले आहे. त्यांचा गंधमुक्तीचा कार्यक्रम बुधवारी पारोळा येथे होता. त्या कार्यक्रमासाठी गोसावी व पाटील हे दुचाकीने जात असताना समोरुन येणाऱ्या वाहनाने दुचाकीला कट मारला व त्यात दोघं जण खाली पडले व त्याचवेळी मागून आलेल्या वाहनाचे टायर गोसावी यांच्या अंगावरुन गेले, असे सांगितले जात आहे. मात्र नेमकी घटना कशी घडली हे ठामपणे कोणीच सांगू शकले नाही. यात संदीप पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातJalgaonजळगावPoliceपोलिस