शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 21:11 IST

Sushant Singh Rajput Suicide : सुशांत नियमित डायरी लिहायचा. याबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही माहिती दिली होती.

ठळक मुद्देया डायरीतील शेवटच्या पानांमधून महत्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात आणि मारेकऱ्याचा सुगावा लागू शकतो असा दावा सुशांचे वडील के के सिंग यांचे वकील विकास सिंग यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत त्याच्या पर्सनल डायरीतून खूप मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये मुंबईपोलिसांनी सुशांतची डायरी जप्त केली होती. ही डायरी आता सीबीआयच्या हाती लागली आहे. मात्र, आता सुशांतच्या डायरीची काही पानं फाडल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच या डायरीतील शेवटच्या पानांमधून महत्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात आणि मारेकऱ्याचा सुगावा लागू शकतो असा दावा सुशांचे वडील के के सिंग यांचे वकील विकास सिंग यांनी केला आहे.सुशांत नियमित डायरी लिहायचा. याबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही माहिती दिली होती. वर्तमानातील नोंदी आणि भविष्यातील त्याची स्वप्नं या डायरीमध्ये उतरवत असे. शिवाय काही आर्थिक बाबीच्या नोंंदी असल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे सीबीआय तपासात सुशांतची ही डायरी खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.सुशांतचे वडील के के सिंह यांचे वकील विकास सिंह यांनीदेखील या डायरीचा उल्लेख केला होता. या डायरीतून अनेक खुलासे होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, या डायरीतील काही पानं गायब आहेत.तरी देखील या डायरीतील शेवटची पाने खूप मोठा उलगडा करू शकतात.जूनमध्ये मुंबईपोलिसांनी सुशांतच्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांना बरीच माहिती मिळाली. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती त्यांना मिळाली. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने माहिती लिहिली होती. दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ, वडील आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. सुशांतच्या बँक खात्यातून थेट शोविकच्या खात्यात पैसे वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. कोटक बँकेतून हे पैशाचे व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं आहे.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या 2 प्रॉपर्टीसंदर्भात तिची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे तिला ईडीकडून बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

रिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य

सुशांतने आत्महत्येच्या एक दिवस आधी अनेक बडे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी आधीच्या सिनेमांविषयी चर्चा केली होती. 12 मिनिटांच्या आत त्यांनी 5 वेळा कॉल केला. यात निखिल आडवाणी, रमेश तौराणी यांची नाव सामील आहे. रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात आली आहे. रियाने एक्स मॅनेजर श्रुती मोदीला अनेक फोन केले. श्रुती, सुशांतची एक्स मॅनेजर होती. त्यानंतर रिया सुशांतच्या मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला कॉल केला, मग सुशांतशी बोलणं केले. श्रुती मोदी आणि सॅम्युअल मिरांडा विरोधात सुशांतच्या वडिलांनी आणि CBI ने FIR दाखल केले आहे.  रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. रिपोर्टनुसार रिया 147 वेळा सुशांतशी बोलली. 808 कॉल श्रुतीला तर 289 कॉल्स सॅम्युअलला केले. फिल्ममेकर महेश भट यांचं नाव देखील कॉल डिटेल्समध्ये समोर आले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

 

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला 

 

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

 

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

 

Disha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख

 

संताप झाला अनावर! रागाच्या भरात पठ्ठ्याने चक्क बॉसच्या नावे पाठवले सेक्स टॉय

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याadvocateवकिलCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबईPoliceपोलिस