शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

चोक्सीच्या जमिनीचा परवाना रद्द, उद्योग विकास आयुक्तांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:13 AM

पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीची सुमारे २६ एकर जमीन रायगड जिह्यातील पनवेल तालुक्यात असल्याचे उघड झाल्यावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल पनवेल तहसील कार्यालयाकडून मागविला आहे.

- वैभव गायकरपनवेल  - पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीची सुमारे २६ एकर जमीन रायगड जिह्यातील पनवेल तालुक्यात असल्याचे उघड झाल्यावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल पनवेल तहसील कार्यालयाकडून मागविला आहे. तर या जागेकरिता चोक्सीने मिळविलेला औद्योगिक वापराकरिता परवाना उद्योग विकास आयुक्तांकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खोटी माहिती देऊन चोक्सीने हा औद्योगिक वापर परवाना मिळविल्याचे उघड झाले आहे.चोक्सीने गीतांजली जेम्स लिमिटेड या नावाने औद्योगिक वापर परवाना मिळविला होता. मात्र, संबंधित जमीन चोक्सीच्या नावावर असल्याने उद्योग विकास आयुक्तांनी या संदर्भात रायगड जिल्हाधिकाºयाकडे संबंधित जमिनीचा अहवाल मागविला होता. जिल्हाधिकाºयांनी पनवेल तहसील कार्यालयाला गीतांजली जेम्स लिमिटेड या नावाने पनवेल तालुक्यात किती जमीन आहे, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.पनवेल तहसील कार्यालयाने याबाबत छाननी केली असता, चिरवत व सांगुर्ली या गावांमध्ये एकूण २० सात-बारा चोक्सीच्या नावावर असल्याचे उघडकीस झाले. एकूण २६ सात-बारापैकी पाच सात-बारा इतर व्यक्तींच्या नावावर आहेत, तर एका सात-बाराची नोंद सापडत नसल्याचा अहवाल पनवेल तहसीलकार्यालयाने रायगड जिल्हाधिकाºयांना पाठविला.२००६ मध्ये मेहुल चोक्सीने ही जमीन खरेदी केल्याचे समजते. या कार्यकाळात चोक्सीने पीएनबीकडून कर्ज घेतल्याचे समजते. मुंबई-गोवा महामार्गाजवळ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेवर चोक्सीला मोठा प्रकल्प उभारायचा होता. त्या उद्देशानेच चोक्सीने उद्योग विकास आयुक्तांकडून परवाना मिळविला होता.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरात होऊ घातल्याने अनेक बड्या विकासकांनी व उद्योजकांनी पनवेल परिसरात जमिनी खरेदी केल्या आहेत. या ठिकाणी अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत. याच अनुषंगानेच चोक्सीने ही जमीन खरेदी केली होती. चोक्सीने घेतलेले कर्जाचे पैसे अनेक ठिकाणी वळते केल्याचे समजते आहे.औद्योगिक परवान्याबाबत संशयगीतांजली जेम्स लिमिटेडला औद्योगिक विकास आयुक्तांनी परवाना दिल्याचे उघड झाले आहे. मात्र, संबंधित जागा मेहुल चोक्सीच्या नावावर असताना उद्योग विकास आयुक्तांनी गीतांजली जेम्स लिमिटेडला परवाना दिलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परवाना मिळविताना चोक्सीने उद्योग विकास आयुक्तांची दिशाभूल केल्याची शक्यता आहे. हा दंडनीय अपराध असल्याने त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.सेबीने घेतले सात-बारा ताब्यातमेहुल चोक्सीचा पीएनबीतील घोटाळा बाहेर आल्यानंतर सेबीने चोक्सीच्या अनेक मालमत्तांवर छापा टाकला. या घोटाळ्यानंतर पनवेलमधील जमिनीचे सात-बारादेखील सेबीने शिरढोण तलाठी कार्यालयातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हाधिकाºयांनी गीतांजली जेम्स लिमिटेड या नावाने पनवेल तालुक्यात किती जागा असल्याचा अहवाल मागविला. मात्र, या नावाने जमिनी नसल्याचा अहवाल आम्ही जिल्हाधिकाºयांना पाठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही सर्वे नंबर आमच्याकडे पाठविण्यात आले, त्यानुसार संबंधित सर्वे नंबर हे मेहुल चोक्सीच्या नावावर असल्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांना दिला आहे. - दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी