बियाणं खरेदीसाठी आलेल्या शेतकरी महिलेची रोख रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 23:29 IST2021-06-10T23:28:54+5:302021-06-10T23:29:58+5:30
शकुंतला गिरडकर ही महिला कृषी केंद्रामध्ये बियाणे खरेदीसाठी जात असताना तिच्या पिशवीत असलेले ४९ हजार रुपये अज्ञाताने लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच त्या महिलेला मोठा धक्का बसला

बियाणं खरेदीसाठी आलेल्या शेतकरी महिलेची रोख रक्कम लंपास
यवतमाळ : मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शहरातील दत्त चौक परिसरात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळली आहे. गुरुवारी बियाणे घेण्यासाठी शेतकरी महिला आली असता तिचे रोख रक्कम अज्ञाताने लंपास केली.
शकुंतला गिरडकर ही महिला कृषी केंद्रामध्ये बियाणे खरेदीसाठी जात असताना तिच्या पिशवीत असलेले ४९ हजार रुपये अज्ञाताने लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच त्या महिलेला मोठा धक्का बसला. कसे बसे सावरत मदतीसाठी तिने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही तत्परता दाखवत तत्काळ दत्त चौक परिसर गाठला. ज्या भागात चोरी झाली, तेथे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र फुटेज मिळाले नाही. बॅगेतून रोख कुणी कशी काढली याचा अंदाजही त्या महिलेला आला नाही. बियाणे मिळावे या लगबगीत चोरट्याने हात साधला. आता खरिपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न या महिलेपुढे उभा ठाकला आहे.