शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 16:40 IST

याप्रकरणी चेतन दंड याच्याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे गोग्रासवाडी परिसरात राहणा-या चेतनने त्याच्या आईचे नावाची देसर इन्वेसमेंट ही गुंतवणूक स्किम चालू केली. या तिघा गुंतवणुकदारांप्रमाणे ठाणे, नवीमुंबई, मुंबई तसेच गुजरात राज्यामध्ये देखील लोकांना पैसे गुंतवण्यास परावृत्त करून त्यांची देखील मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

डोंबिवली:  गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टकके तर एका वर्षात दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवित तिघा गुंतवणूकदारांना एकूण 52 लाख 90 हजारांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चेतन दंड याच्याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.गोग्रासवाडी परिसरात राहणा-या चेतनने त्याच्या आईचे नावाची देसर इन्वेसमेंट ही गुंतवणूक स्किम चालू केली. यात गुंतवणूक केल्यास दरमहा 5 टकके दराने परतावा मिळेल अशी सोशल मिडीयावर जाहिरात दिली. ही जाहीरात बघून ठाणो येथे राहणारे निर्मल शहा यांनी चेतनशी संपर्क साधला. दरमहा 5 टकके दराने तसेच एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देवून शहा यांच्याकडून रककम स्विकारण्यात आली. काही काळ ठरल्याप्रमाणो पैसे ही शहा यांना परत करण्यात आले. परंतू नोव्हेंबर 2019 पासून कोणताही परतावा चेतनने दिलेला नाही अथवा मुद्दल देखील परत केलेली नाही.  त्यांच्या परिवाराची तब्बल 25 लाख 20 हजाराची फसवणूक केल्याचा आरोप शहा यांचा आहे. शहा यांच्याप्रमाणोच प्रिती ठककर यांच्या परिवाराची 22 लाख 80 हजार आणि मेहुल भट यांचे 4 लाख 90 हजार अशा तिघा गुंतवणूकदारांची  एकुण 52 लाख 90 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार चेतन विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या तिघा गुंतवणुकदारांप्रमाणे ठाणे, नवीमुंबई, मुंबई तसेच गुजरात राज्यामध्ये देखील लोकांना पैसे गुंतवण्यास परावृत्त करून त्यांची देखील मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

 

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसInvestmentगुंतवणूक