नोकरीचे आमिष दाखवून 80 लाखाचा चुना लावणाऱ्यास  अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 21:09 IST2018-12-22T21:07:14+5:302018-12-22T21:09:09+5:30

तरुणांना आरोग्य विभागाची बनावट जाहिरात देवून अनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणारा जितेंद्र बंडू भोसले (रा. नवी मुंबई) याला मुंबई येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. 

Lakhs of people who looted 80 lakh | नोकरीचे आमिष दाखवून 80 लाखाचा चुना लावणाऱ्यास  अटक

नोकरीचे आमिष दाखवून 80 लाखाचा चुना लावणाऱ्यास  अटक

ठळक मुद्देअनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणारा जितेंद्र बंडू भोसले (रा. नवी मुंबई) याला मुंबई येथून एमआयडीसी पोलिसांनी अटकत्याने जिल्ह्यातील जवळपास 18 युवकांना 80 लाख रुपयांना नोकरीचे आमिष दाखवून गंडविल्याचे पोलिसांनी सांगितलेन्यायालयाने 26 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लातूर - लातूरसह शेजारच्या जिल्ह्यातील तरुणांना आरोग्य विभागाची बनावट जाहिरात देवून अनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणारा जितेंद्र बंडू भोसले (रा. नवी मुंबई) याला मुंबई येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. 

त्याने जिल्ह्यातील जवळपास 18 युवकांना 80 लाख रुपयांना नोकरीचे आमिष दाखवून गंडविल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोग्य विभागात लिपिक, आरोग्य सेवक म्हणून बनावट नियुक्ती पत्र दिल्याचे पुढे आले आहे. याबाबत नोव्हेंबर महिन्यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला लातुरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Lakhs of people who looted 80 lakh