शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Lakhimpura Protest : अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, हिंसाचारात एकूण 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 11:41 AM

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडल.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तीव्र आंदोलन केल्याने अखेर मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखीपुरात येथे काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर, संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली आहे. त्यामध्ये जखमी झालेल्या एका पत्रकाराचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे, येथील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 व पोहोचली आहे. आता, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून केंद्रीयमंत्र्यांच्या मुलाला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. 

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडलं. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्या अंगावर गाडी आदळण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आशिष मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हत्या, मृत्यूस जबाबदार, अपघात यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तीव्र आंदोलन केल्याने अखेर मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. 

काय आहे घटना ?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा असं आहे. तर, आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप भाजप समर्थकांकडून होत आहे. 

टॅग्स :ministerमंत्रीCrime Newsगुन्हेगारीFarmers Protestशेतकरी आंदोलनPoliceपोलिस