शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

लखीमपूर खेरीतील मुख्य आरोपी आशिष मिश्रानं केलं सरंडर, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता जामिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 18:31 IST

लखीमपूर हिंसेचा मुख्य आरोपी आशिष मिश्रानं सरंडर केलं आहे. त्याला अलाहाबाद न्यायालयानं दिलेला जामिन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला होता.

उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि लखीमपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी अशिष मिश्रानं लखीपूरच्या न्यायालयात सरंडर केलं आहे. सरंडर केल्यानंतर लखीमपूर पोलिसांनी आशिष मिश्राची रवानगी तुरूंगात केली. आशिष मिश्राला अलाहबाद न्यायालयानं जामिन मंजूर केला होता. परंतु नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं.

सर्वोच्च न्यायालयानं गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आणि लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला देण्यात आलेला जामिन रद्द केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार आशिष मिश्रानं रविवारीच सरंडर केलं. त्यानं सीजेएमच्या न्यायालयात जाऊन सरंडर केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयानं त्याला दिलेली मुदत २५ एप्रिल रोजी संपणार होती.

हिंसाचारातआठजणांचामृत्यूलखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

२०८जणांनीनोंदवलीसाक्षतपासात, एसआयटीला १७ वैज्ञानिक पुरावे, सात भौतिक पुरावे आणि २४ व्हिडिओ फोटो सापडले, ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या. याशिवाय २०८ जणांनी साक्ष दिली. या आधारे एसआयटीने आरोपपत्र दाखल केले. मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय