मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीवर आपल्या चार प्रियकरांकडून घडवून आणला गॅंगरेप आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 10:42 IST2022-06-30T10:42:12+5:302022-06-30T10:42:28+5:30
UP Crime News : लखीमपूर खीरीचे एसपी संजीव सुमन यांनी सांगितलं की, 'मोठ्या बहिणीचे गावातीलच साधारण 4 ते 5 तरूणांसोबत अनैतिक संबंध होते. ज्याचा लहान बहीण नेहमीच विरोध करत होती.

मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीवर आपल्या चार प्रियकरांकडून घडवून आणला गॅंगरेप आणि मग...
UP Crime News : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात एका तरूणीचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला. पोलिसांनी तरूणीच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली तर मृत तरूणीची मोठी बहीण जरा घाबरलेली दिसली. तेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली. पोलिसांना समजलं की, मोठ्या बहिणी तिच्या प्रियकरांकडून आपल्या लहान बहिणीवर गॅंगरेप घडवून आणला होता.
लखीमपूर खीरीचे एसपी संजीव सुमन यांनी सांगितलं की, 'मोठ्या बहिणीचे गावातीलच साधारण 4 ते 5 तरूणांसोबत अनैतिक संबंध होते. ज्याचा लहान बहीण नेहमीच विरोध करत होती. अशात मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा काटा काढण्यासाठी एक प्लान केला आणि आपल्या लहान बहिणीला शेतात बोलवलं'.
पोलिसांनी सांगितलं की, 'शेतात आधीच आलेल्या मोठ्या बहिणीच्या चार प्रियकरांनी तिच्या लहान बहिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा मोठ्या बहिणीने आणि तिच्या एका प्रियकराने तिचे दोन्ही हात पकडले. मग आळीपाळीने मोठ्या बहिणीच्या चारही प्रियकरांनी तिच्यावर रेप केला'.
एसपी संजीव सुमन यांनी सांगितलं की, यानंतर सर्वांनी मिळून ओढणीने लहान बहिणीचा गळा आवळून तिची हत्या केली. या प्रकरणात कोणत्याही आरोपीकडे मोबाइल नाहीय. सामान्यपणे हेच बघण्यात आलं आहे की, पॉर्न व्हिडीओ किंवा मोबाइल फोन वापरणारे जास्तकरून अशा घटना घडवून आणतात.
याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. यात मोठ्या बहिणीसोबतच रेप करणाऱ्या चार आरोपींचा समावेश आहे आणि इतरही तीन आरोपी आहेत.