सततच्या भांडणाला कंटाळून महिलेकडून तरुणावर कुऱ्हाडीचे वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 17:12 IST2018-09-04T16:44:11+5:302018-09-04T17:12:47+5:30
रुणाबरोबर सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून महिलेने त्याला कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास विठ्ठनगरमध्ये घडली.

सततच्या भांडणाला कंटाळून महिलेकडून तरुणावर कुऱ्हाडीचे वार
पिंपरी : तरुणाबरोबर सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून महिलेने त्याला कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास विठ्ठनगरमध्ये घडली. प्रविण भागवत (वय ३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात सविता जाधव या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आणि प्रवीण हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते विठ्ठलनगरमधील इमारत क्र.१ येथील चौथ्या मजल्यावर शेजारी-शेजारी राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून सतत भांडण होत होते. सोमवारी प्रवीण दारु पिऊन आला. त्याचे आणि सविताचे कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या सविताने घरातील कुऱ्हाडीने प्रविण याच्या मानेवर वार केले. तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. शेजारील नागरिकांनी प्रविणला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या मानेच्या नसा तुटल्या असल्याचे सांगितले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी सविता ही विवाहित असून तीला दोन मुल आहेत. पोलिसांनी अद्याप तिला अटक केलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.