मजुरीच्या पैश्यासाठी मजुराने केली ठेकेदाराच्या भावाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 16:52 IST2023-06-04T16:52:34+5:302023-06-04T16:52:47+5:30

फरार आरोपीच्या शोधात माणिकपूर पोलीस

Laborer killed contractor's brother for wage money | मजुरीच्या पैश्यासाठी मजुराने केली ठेकेदाराच्या भावाची हत्या

मजुरीच्या पैश्यासाठी मजुराने केली ठेकेदाराच्या भावाची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): वसईच्या सनसिटी येथील एका इमारतीच्यावर पत्र्याच्या शेडचे बांधकाम सुरू होते. या इमारतीच्या पत्र्याच्या शेडमध्ये शनिवारी मध्यरात्री ठेकेदाराच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. मोईन मोहम्मद (३८) याची हत्या करण्यात आली आहे. ठेकेदार आवेश फारूख मोहम्मद (३५) याने कासा द तेरेजा या इमारतीच्या पत्र्याच्या शेडचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी आरोपी अरबाज आलम मजुरी काम करत होता. त्याने ठेकेदाराचा भाऊ मोईन महम्मद याची शनिवारी मध्यरात्री डोक्यात लाकडी फळी घालून हत्या केली आहे. माणिकपूर पोलिसांनी रविवारी पहाटे हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

आरोपी अरबाज आलम (२५) याला ठेकेदाराने संपूर्ण पगाराचे पैसे कमी दिले होते. याच रागातून त्याने ठेकेदाराचा भाऊ मोईन मोहम्मद याला चेहऱ्यावर, गळ्यावर व डोक्यात लाकडी फळीने मारहाण करून साध्या व गंभीर दुखापती करून जीवे ठार मारले आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टिम रवाना झाल्याची माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Laborer killed contractor's brother for wage money