बनावट कोविड अहवाल देणाऱ्या लॅबचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:46 AM2021-04-23T05:46:03+5:302021-04-23T05:46:12+5:30

भिवंडीतील घटना; चार जणांना केली अटक

Lab exposed for fake covid report | बनावट कोविड अहवाल देणाऱ्या लॅबचा पर्दाफाश

बनावट कोविड अहवाल देणाऱ्या लॅबचा पर्दाफाश

googlenewsNext

 


लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल तयार करून अवघ्या ५०० रुपयात विकणाऱ्या पॅथॅालॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केली.  रब्बनी अनवारूल हक सैयद (वय ३१), अफताब आलम मुजीबुल्ला खान (वय २२) व मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख (वय २०) या तिघांना बुधवारी अटक केली. चौथा आरोपी मेहफुज आलम मुजीबुल्ला खान (वय २९) याला गुरुवारी अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी गुन्हे शाखेने सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिarली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडीतील शांतीनगर परिसरात आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोनाचे निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह बनावट अहवाल ५०० रुपयात बनवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला कळताच मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदिया शाळेसमोर असलेल्या महेफुज लॅबोरेटरी येथे बनावट ग्राहकाला निगेटिव्ह अहवाल घेण्यासाठी पाठविले. आरटीपीसीआर तपासणीकरिता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता निगेटिव्ह अहवाल थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून बनावट अहवाल देताना महेफुज लॅबमधील तिघांना पकडले. या लॅबची झडती घेतली असता आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ जणांचे अहवाल सापडले. त्यामध्ये ५९ हे निगेटिव्ह व ५ पॉझिटिव्ह होते. या प्रकरणी लॅब टेक्निशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांची चौकशी केली असता त्यांनी हे बनावट अहवाल लॅबमध्ये मोबाइल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या मदतीने तयार केल्याची कबुली दिली.
भिवंडीतून परराज्यामध्ये जाण्यासाठी कामगारांना आरटीपीसीआर तपासणी अहवाल हा निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. प्रत्येक अहवाल हा कमीतकमी ५०० रुपये दराने बनावटरित्या थायरोकेअर या लॅबच्या लेटरहेडवर तयार केलेले आहेत. हे सर्व अहवाल मेहफूज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार केले व दिल्याची कबुली दिली आहे.
चाचणीसाठी परवानगी दिली नव्हती
nया आरोपींकडून पडघा परिसरातील कोशिंबी येथील साईधारा कंपाउंडमधील वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी घेतलेले एकूण ५८९ स्वॅब, ४३० आधारकार्डच्या झेरॉक्स, ५६९ आय. सी.एम.आर.चे फॉर्म हे लॅबमध्ये सापडले. 
nयापूर्वी अनेक कंपन्यातील कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीचे बनावट अहवाल तयार करून विक्री केल्याचे तपासात समोर आली आहे. पोलिसांनी भिवंडी पालिकेकडून माहिती घेतली असता मेहफुज लॅब यांना आरटीपीसीआर तपासणीची परवानगी दिलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Lab exposed for fake covid report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.