धक्कादायक! बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे तब्बल 1 कोटी रुपये; 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 03:52 PM2021-11-08T15:52:13+5:302021-11-08T15:59:19+5:30

Bank manager online gambling : बँक मॅनेजरनेच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

kullu himachal gramin bank kullu branch fraud by manager for online gambling | धक्कादायक! बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे तब्बल 1 कोटी रुपये; 'अशी' झाली पोलखोल

धक्कादायक! बँक मॅनेजरने जुगारात उडवले ग्राहकांचे तब्बल 1 कोटी रुपये; 'अशी' झाली पोलखोल

Next

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील ग्रामीण बँकेच्या दोहरानाला शाखेतील मॅनेजरनेच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मॅनेजरने ग्राहकांचे पैसे जुगारात उडवले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून बँकेने देखील त्याला निलंबित केलं आहे. प्रसूनदीप अत्री असं या बँक मॅनेजरचं नाव होतं. तो ग्राहकांच्या खात्यातील पैसे वापरून ऑनलाईन जुगार खेळत होता. जुगार जिंकल्यानंतर पुन्हा त्या खात्यांमध्ये पैसे टाकत होता. एका ग्राहकाने केलेल्या तक्रारी नंतर त्याची आता पोलखोल झाली आहे. 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूनदीप अत्री याने जवळपास एक कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. सध्या बँकेचं एक पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीला निलंबित करण्यात आलं आहे. बँक घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यानंतर उर्वरित खातेदारही आपले पासबुक अपडेट करण्यासाठी बँकेत पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लु जिल्ह्यातील रहिवासी असलेले धरमचंद हे पासबुक अपडेट करण्यासाठी हिमाचल ग्रामीण गेले होते. पासबुक अपडेट केल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून चार लाख रुपये काढल्याची नंतर पुन्हा जमा केल्याची एंट्री दिसली. 

अनेकांच्या खात्यांमध्ये अशाच प्रकारची गडबड

किसान क्रेडिट लिमिट सुविधेचा वापर करून हे चार लाख रुपये काढण्यात आले होते. हा नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्यासाठी धरमचंद यांनी बँक मॅनेजरशी संपर्क साधला. तेव्हा सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पासबुकवर तशी नोंद आल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मात्र धरमचंद यांच्या शंकेचं समाधान झालं नव्हतं. त्यांनी आपल्या ओळखीतील लोकांना आपापलं बँक पासबुक अपडेट करण्यास सांगितलं. तेव्हा अनेकांच्या खात्यांमध्ये अशाच प्रकारची गडबड झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर सर्वांनी मिळून बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली. 

ब्रांच मॅनेजर पैशांची अफरातफर करत असल्याचं उघड

चौकशीमध्ये ब्रांच मॅनेजर पैशांची अफरातफर करत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी आरोपी ब्रँच मॅनेजर प्रसूनदीप अत्रीला अटक केली आहे. मूळचा राजस्थानमधील चुरू येथील रहिवासी असलेला अत्री हा दीड वर्षांपूर्वी हिमाचलमधील दोहरानाला बँक शाखेत मॅनेजर होता. त्याला ऑनलाईन जुगार खेळण्याची आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची सवय होती. सुरुवातीला तो आपल्या पगारातील पैसे गुंतवत राहिला. मात्र, आपल्याकडील पैसे संपल्यानंतर त्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: kullu himachal gramin bank kullu branch fraud by manager for online gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.