Kshitij Prasad remanded in NCB custody till October 3 in Bollywood drugs case | बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

मुंबई - बालीवूडमधील ड्रग्ज  कनेक्शन प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या क्षितिज रविप्रसाद याला 3 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे .त्याच्या घरी जप्त केलेले ड्रग्ज व बँक व्यवहाराची तपासणी केली जाणार असून त्यातून आणखी काही बडी नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान,  क्षितिजने आपल्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकविण्यात आले असल्याचा दावा कोर्टासमोर केला आहे. 

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित कंपनीसोबत एका प्रकल्पासाठी सहदिग्दर्शक म्हणून करार केलेल्या क्षितिजला शनिवारी एनसीबीने अटक केली. त्याची कोरोना व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रविवारी त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायदंडाधिकाऱ्या समोर उभे करण्यात आले.  यावेळी त्याच्या घरातून  सिगरेटी गांजाबरोबरच काही रोख रक्कम व बँके खात्याबाबत  माहिती मिळाली आहे,  त्याबाबत सविस्तर तपासासाठी  9 दिवस कोठडी द्यावी,  अशी अधिकाऱ्यांनी  मागणी केली.   क्षितिजच्यावतीने तो  निर्दोष असून त्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आल्याचे सांगण्यात आले.अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसाची कोठडी सुनावली. दरम्यान, करण जोहरने क्षितिजचा धर्मा प्रॉडक्शनशी कसलाही संबंध नाही, त्याला आपण ओळखतही नसल्याचा दावा केला आहे.

Web Title: Kshitij Prasad remanded in NCB custody till October 3 in Bollywood drugs case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.