भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:25 IST2019-05-20T19:24:14+5:302019-05-20T19:25:18+5:30
भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना थेरगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली...

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना थेरगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली. मोन्या उर्फ प्रशांत सतिश सोनवणे, अविनाश मुरकुटे, कृष्णा गडहिरे, आशपाक शेख व इतर दोन मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रुपेश विजय सुर्यवंशी (वय १८, रा. जयभवानीनगर, अमृता फ्रेश मार्केटच्यासमोर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तर पंकजधनु सिंग असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सुर्यवंशी यांच्याशी झालेल्या किरकोळ बाचाबाचीच्या कारणावरुन आरोपी रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सुर्यवंशी यांच्या घरासमोर जमले. त्यांनी सुर्यवंशी यांच्या मित्रांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. दरम्यान, पंकजधनु सिंग हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता आरोपी अविनाश मुरकुटे याने कोयत्याने पंकजधनु सिंग यांच्यावर वार केले. यामध्ये जखमी झाले असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.