शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरण : मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई ईडीच्या फेऱ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 14:22 IST

नितीन सरदेसाई यांचा सहभाग असल्याची चौकशी वर्तवत ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 

ठळक मुद्देकोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी सरदेसाई यांना ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या नोटीसनंतर नितीन सरदेसाई आज ईडी कार्यालयात हजर झाले आहे.

मुंबई - सध्या मुंबईत गाजत असलेल्या कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सहकारी आणि मनसे माजी आमदार नितीन सरदेसाई अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी सरदेसाई यांना ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या नोटीसनंतर नितीन सरदेसाई आज ईडी कार्यालयात हजर झाले आहे. कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये नितीन सरदेसाई यांचा सहभाग असल्याची चौकशी वर्तवत ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 

ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याचे चिरंजीव उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला अनेक आठ तास उन्मेष जोशी यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. नंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, बांधकाम व्यावसायिक आणि भागीदार राजन शिरोडकर यांची ईडीने चौकशी केली. तसेच उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची एकत्रित चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील जवळपास नऊ तास चौकशी ईडीने केली.  

‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस’ने (आयएल अँड एफएस) कोहिनूर सीटीएनएल कंपनीत केलेल्या गुंतवणुकीत कंपनीला झालेला तोटा आणि कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चरने कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी ईडीद्वारे ही केली जात आहे.दादर येथील कोहिनूर मिल नं. तीन ४२१ कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्वेअर’ विकसित करण्यासाठी कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी उन्मेष जोशी यांनी स्थापन केली होती. राज, उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र, कालांतराने राज यांनी या कंपनीतून माघार घेत आपले समभागही विकून टाकले होते. या संपूर्ण व्यवहाराची ईडी चौकशी करत आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRaj Thackerayराज ठाकरेNitin Sardesaiनितीन सरदेसाईMumbaiमुंबईMNSमनसे