धक्कादायक! ४ वर्षे प्रपोज करत होता, तरुणीने दिला नकार, तरुणाने उचललं धक्कादायक पाऊलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:20 IST2023-03-28T20:15:28+5:302023-03-28T20:20:26+5:30
पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

धक्कादायक! ४ वर्षे प्रपोज करत होता, तरुणीने दिला नकार, तरुणाने उचललं धक्कादायक पाऊलं
एका तरुणाला एक तरुणी आवडते. तरुण तिच्या पाठिमागे तब्बल चार वर्ष लागतो. पण प्रत्येकवेळी या तरुणीने नकार दिला. पण, अखेर त्या तरुणाच्या संयमाचा बांध फुटला. एकतर्फी प्रेमात पागल झालेल्या प्रियकराने तरुणीच्या हत्येचा कट रचला. त्याच्यासह ४ साथीदारांच्या मदतीने मुलीचे अपहरण करून कारमध्ये नेले. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तरुणीची हत्या करुन एका पोत्यात भरुन दगडखाणीत पुरण्यात आले. दुसरीकडे, ६ दिवस पोलीस मुलीच्या शोधात परिसरात शोध घेत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणावर आला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मुख्य आरोपी सांकी आशिकसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पत्नीशी झाला वाद, पतीने प्रायव्हेट फोटो केले शेअर अन् लिहिले, 'पूर्ण झाला बदला', नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण डोमंच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणारी सोनी सलोनी ६ दिवसांपूर्वी म्हणजेच २१ मार्च रोजी अचानक बेपत्ता झाली. वडील सुनील साओ यांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांच्या मुलीचे कारमधून आलेल्या तरुणांनी अपहरण केल्याचे कुटुंबीयांना समजले. याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. संशयाच्या आधारे पोलिसांनी बेपत्ता सोनीचा एकतर्फी प्रियकर दीपक गुप्ता व इतरांना ताब्यात घेतले.
चौकशीत तरुण दीपक गुप्ता याने आपला गुन्हा कबुल केला. ४ साथीदारांनी तरुणीचे अपहरण केले. रोहित कार चालवत होता. सोनीला एका निर्जनस्थळी नेऊन गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.