शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नपत्रिकेत चाकू, FB फ्रेंड न बनवल्याने 16 वर्षीय मुलीची हत्या, आईवरही हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 21:30 IST

Crime News : पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील हायवे पोलिस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.

मथुरा जिल्ह्यातील आई-मुलीच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याने माथेफिरूने ही घटना घडवली होती. तरुणाने आधी अल्पवयीन मुलीवर वार करून खून केला आणि मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी हा मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे. 

पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील हायवे पोलिस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर फ्रेंड बनण्याची विनंती न स्वीकारल्याने तरुणाने ही घटना घडवली.एसपी मार्तंड प्रकाश सिंह यांनी सांगितले की, नागला बोहरा गावचे रहिवासी असलेले निवृत्त सैनिक तेजवीर सिंग हे फरीदाबाद (हरियाणा) येथील एका कारखान्यात सुरक्षा कर्मचारी आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरा घरी नसताना मुझफ्फरनगरच्या ठाणे मंडी भागातील कुकडा गावातील रवी हा तरुण लग्नपत्रिका घेऊन त्याच्या घरी पोहोचला आणि त्याची १६ वर्षांची मुलगी खोलीत येताच, त्याने लग्नपत्रिकेत लपवून ठेवलेला चाकू काढला आणि त्याने मायलेकींवर अनेक वेळा हल्ला केला.त्याने सांगितले की, मुलीचा आरडाओरडा ऐकून तिची आई सुनीता खोलीत पोहोचली तेव्हा रवीने तिच्या खांद्यावर आणि कमरेवर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी रवीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने स्वतःवर चाकूने वार करून जखमी केले.डीसीपी धर्मेंद्र चौहान यांनी सांगितले की, हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या आईला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर आरोपी रवीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्न