माहेरहून लवकर न आल्याने पत्नीवर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:53 IST2019-08-22T16:50:21+5:302019-08-22T16:53:24+5:30
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी माहेरी गेल्या होत्या.

माहेरहून लवकर न आल्याने पत्नीवर चाकूने वार
पिंपरी : रक्षाबंधनसाठी माहेरी गेलेली महिला लवकर घरी आली नाही. त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीवर चाकूने वार केले. तसेच शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.२०) रात्री साठे आठच्या सुमारास संभाजीनगर येथे घडली.
ज्योती संतोष सावळे (वय २९, रा. संभाजीनगर) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती संतोष तुकाराम आवळे (वय ४२, रा. संभाजीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी माहेरी गेल्या होत्या. माहेरहून सासरी येण्यास त्यांना उशीर झाला. या कारणावरून आरोपी संतोष याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच चाकूने हातावर वार केले. यामध्ये ज्योती जखमी झाल्या. याबाबत त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.