गस्तीवर असलेल्या ऑनड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 06:32 PM2021-10-16T18:32:56+5:302021-10-16T18:33:35+5:30

Knife attack on on-duty police : याप्रकारने खळबळ उडाली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Knife attack on on-duty police on patrol, charges filed | गस्तीवर असलेल्या ऑनड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला, गुन्हा दाखल

गस्तीवर असलेल्या ऑनड्युटी पोलिसांवर चाकूने हल्ला, गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देउल्हासनगरच्या कॅम्प-४ गुरुवारी मध्यरात्री परिसरात राहणारे संजय शितलानी व नरेश यांच्या गटात पैशातून वाद होऊन परस्पर विरोधी ठाकले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरात गुरवारी मध्यरात्री दोन गट पैशाच्या वादातून आमने-सामने ठाकले. त्यावेळी रात्र गस्तीवर असलेले पोलीस नाईक गणेश डमाले व गणेश राठोड यांनी त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला असता गटातील काही जणांनी गणेश डमाले यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकारने खळबळ उडाली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगरच्या कॅम्प-४ गुरुवारी मध्यरात्री परिसरात राहणारे संजय शितलानी व नरेश यांच्या गटात पैशातून वाद होऊन परस्पर विरोधी ठाकले. दोन्ही गटाकडे शस्त्र असल्याने, मोठा अनर्थ होऊ शकतो. अशी शक्यता लक्षात घेऊन रात्र गस्तीवर असलेले पोलीस नाईक गणेश डमाले व गणेश राठोड यांनी दोन्ही गटात समजोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या गटातील काही जणांनी उलट चक्क पोलीस नाईक गणेश डमाले यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये गणेश डमाले  गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच दोन्ही गटातील काहीजण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

शहरात पोलीसवरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध होत असून शहरातील कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांजवळ कोणत्याही प्रकारचं शस्त्र नसताना त्यांनी हिंमतीने मध्ये पडत हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणून गंभीर दुखापत करणे. या भांदवी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना पकडल्याचे बोलले जाते.

Web Title: Knife attack on on-duty police on patrol, charges filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app