शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बँकेतील लॉकरमधून सासू-सुनेचे दागिने गायब; चोरीची चर्चा होताच लोकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:29 IST

एक महिला आपल्या सासूसोबत बँकेतील लॉकर तपासण्यासाठी गेली असता लॉकरमधून दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला.

दिल्लीतील कीर्ती नगर भागातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गुरुवारी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. एक महिला आपल्या सासूसोबत बँकेतील लॉकर तपासण्यासाठी गेली असता लॉकरमधून दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बँकेचं लॉकर फोडून सोनं चोरीला गेल्याच्या चर्चेने बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला त्यांचं 'जॉइंट लॉकर' तपासण्यासाठी बँकेत पोहोचल्या होत्या. बँक कर्मचाऱ्यांनी नियमानुसार लॉकर उघडून दिलं, मात्र लॉकरमध्ये ठेवलेलं सोनं आणि दागिने गायब असल्याचा दावा महिलांनी केला. त्यांच्या तक्रारीनंतर बँकेत उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं. सोशल मीडियावरही पीएनबीच्या लॉकरमधून सोनं चोरीला गेल्याचे मेसेज फिरू लागल्याने खळबळ उडाली.

चोरीची अफवा पसरताच ज्या ग्राहकांचं लॉकर त्याच शाखेत होतं, ते घाबरून बँकेत धावून आले. बँकेबाहेर लोकांची मोठी गर्दी जमा झाली आणि प्रत्येकजण आपला लॉकर त्वरित तपासण्याची मागणी करू लागला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बँक प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लॉकर रूमची पाहणी केली. प्राथमिक तपासात कोणताही लॉकर तोडल्याचं किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. लॉकर रूमची सुरक्षा व्यवस्थाही सुरक्षित आढळली आहे. तपासादरम्यान असं समोर आलं की, संबंधित महिलांनी ५ फेब्रुवारी रोजी देखील हा लॉकर ऑपरेट केला होता. त्या दिवशी लॉकरमधून काय काढलं गेलं किंवा काय ठेवलं गेलं याचा तपास आता पोलीस करत आहेत. बँक व्यवस्थापनानेही ग्राहकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Panic as Jewelry Vanishes from Bank Locker; Crowd Swarms Branch

Web Summary : Chaos erupted at a Delhi PNB branch after a woman claimed jewelry was stolen from her locker. The news triggered panic among other customers, who rushed to check their lockers. Police investigation is underway, finding no evidence of forced entry.
टॅग्स :delhiदिल्लीbankबँकGoldसोनंCrime Newsगुन्हेगारी