प्रेमप्रकरणातून मालवणी येथे तरुणाची चाकूने भोसकून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:44 IST2019-01-29T13:40:36+5:302019-01-29T13:44:37+5:30

त्यावरून त्यांच्यात वादविवाद झाले आणि नंतर वादविवाद इतक्या विकोपाला गेला की तरुणावर तरुणीच्या भावाने चाकूने हल्ला केला.

Killing of a youth with a knife knife in love | प्रेमप्रकरणातून मालवणी येथे तरुणाची चाकूने भोसकून हत्या  

प्रेमप्रकरणातून मालवणी येथे तरुणाची चाकूने भोसकून हत्या  

ठळक मुद्देवीस वर्षांच्या तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला आहे.मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्य झाला.

मुंबई - मालाड येथील मालवणी परिसरातील गेट क्रमांक ५ येथे २५ वर्षांच्या तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला आहे. मृत तरुणाचे एका १८ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. मात्र, ते तरुणीच्या घरच्यांना मान्य नव्हते. याच वादातून तरुणीच्या भावाने तरुणाची हत्या केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली वसीम बदरुद्दीन खाल (२५) आणि अजमल बदरुद्दीन खान (२३) यांना अटक केली आहे. 

सैफअली शराफत अली (२५) याचे वसीम आणि अजमलच्या बहिणी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंब उत्तर प्रदेशातील असून ते मालवणीत एकाच ठिकाणी राहतात. आज  ९.३० वाजताच्या घरी कोणी नसताना सैफअली प्रेयसीला भेटण्यास तिच्या घरी गेला होता. त्याचा राग आल्याने वसीम आणि अजमलने चाकूने व लाथाबुक्यांनी मारहाण करून सैफअलीला जीवे मारले. याप्रकरणी माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्य झाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Killing of a youth with a knife knife in love