मासे दिले नाहीत म्हणून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 07:39 IST2023-02-27T07:39:38+5:302023-02-27T07:39:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळा : मासे दिले नाहीत म्हणून तालुक्यातील मौजे मांदाड येथे भरदिवसा महिलेची कोयत्याने वार करून हत्या ...

Killed for not giving fish | मासे दिले नाहीत म्हणून हत्या

मासे दिले नाहीत म्हणून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
तळा : मासे दिले नाहीत म्हणून तालुक्यातील मौजे मांदाड येथे भरदिवसा महिलेची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

याबाबत माहिती अशी की, मांदाड कोळीवाडा येथील विठा लक्ष्मण पाटील (वय ६०) या बंदर येथून मासे घेऊन येत असताना आरोपी पांडुरंग लक्ष्मण मानकर याने त्यांच्याकडे माशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्याने मानकर याने वाद घातला. त्याने कोयत्याने पाटील यांच्या चेहऱ्यावर प्रहार करून त्यांना ठार मारले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी व तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर तळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक भास्कर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Web Title: Killed for not giving fish