भाचीची बलात्कारानंतर हत्या, ४ दिवस मृतदेहावर नराधमाने केले अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 20:59 IST2020-03-19T20:55:23+5:302020-03-19T20:59:12+5:30

याप्रकरणी सीतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Killed 6 year old minor niece after raped in chhattisgarh ambikapur pda | भाचीची बलात्कारानंतर हत्या, ४ दिवस मृतदेहावर नराधमाने केले अत्याचार 

भाचीची बलात्कारानंतर हत्या, ४ दिवस मृतदेहावर नराधमाने केले अत्याचार 

ठळक मुद्देअंबिकापूरमध्ये एका १६ वर्षाच्या मुलाने सहा वर्षाच्या भाचीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीच्या मृत शरीरावर नराधमाने लैंगिक अत्याचार केले. विधी संघर्ष बालकाने बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली.

छत्तीसगड - छत्तीसगड येथील अंबिकापूरमध्ये एका १६ वर्षाच्या मुलाने मानलेल्या सहा वर्षाच्या भाचीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीने जोरजोरात आवाज केला तेव्हा तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर देखील चिमुकलीच्या मृत शरीरावर नराधमाने लैंगिक अत्याचार केले. आरोपीने ६ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह घरात चार दिवस लपविला होता. दुर्गंधी पसरू लागल्याने त्याने मृतदेह गावात विहिरीत टाकला.विहिरीतून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी विधिसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सीतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीतापूर टीआय अनूप एक्का यांनी सांगितले की, मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. ११ मार्च रोजी ती घराबाहेर खेळत होती. दरम्यान, अचानक गायब झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतरही चिमुकली सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना कळविले. दरम्यान, १६ मार्च रोजी पोलिसांना चिमुकलीचा मृतदेह खेड्यात असलेल्या विहीरीत पडल्याची माहिती मिळाली. संशयावरून पोलिसांनी विधी संघर्ष बालकाच्या काकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्यानंतर विधी संघर्ष बालकाने बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली.


अशा प्रकारे ही घटना घडली
पोलिसांच्या चौकशीत विधी संघर्ष बालकाने सांगितले की, ११ मार्च रोजी चिमुकली घराबाहेर खेळत होती. दरम्यान,१६ वर्षाचा मुलाने तिला आपल्याबरोबर घरी नेले. यावेळी १६ वर्षीय मुलीचे पालक अंबिकापूर येथे गेले होते. बहीण किराणा दुकानात बसली होती. घरी पोहोचताच १६ वर्षीय मुलाने चिमुकलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिचे तोंड आणि गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर हा मृतदेह त्याच्या घराच्या एका भागात लपविला. चार दिवसानंतर, दुर्गंधी आल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकण्यात आला. 

Web Title: Killed 6 year old minor niece after raped in chhattisgarh ambikapur pda