किडनी तस्कर टोळीचा भांडाफोड, वृत्तपत्रात जाहिरात देऊन ओढायचे जाळ्यात; वाचा संपूर्ण प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:21 IST2021-08-13T13:20:05+5:302021-08-13T13:21:52+5:30
कोलकातामध्ये किडनी तस्कर टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. वृत्तपत्रात जाहिरात देऊन किडनी खरेदीच्या नावावर नागरिकांना फसविण्याचा उद्योग करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

किडनी तस्कर टोळीचा भांडाफोड, वृत्तपत्रात जाहिरात देऊन ओढायचे जाळ्यात; वाचा संपूर्ण प्रकरण...
कोलकातामध्ये किडनी तस्कर टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. वृत्तपत्रात जाहिरात देऊन किडनी खरेदीच्या नावावर नागरिकांना फसविण्याचा उद्योग करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. एका पीडितानं कोलकाताच्या लालबाजार पोलीस मुख्यालयात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Kidney smuggler gang busted in Kolkata, lays traps by advertising in newspapers, know the whole matter)
किडनी तस्करीचं कोलकातामधलं हे काही पहिलं प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी उत्तराखंड आणि हावडा शहर पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त अभियानातून हावडा येथील एका आंतरराज्य किडनी तस्कर टोळीला जेरबंद केलं होतं. यात एका महिलेचाही समावेश होता. किडनी तस्करीसाठी ही टोळी उत्तराखंड आणि कोलकात येथे ये-जा करायची. जगाछा येथील जीआयपी कॉलनमध्ये एका आरोग्य केंद्राच्या आडून किडनी तस्करीचा गोरखधंदा सुरू होता.
किडनी विक्रीसाठी वृत्तपत्रात द्यायचे जाहिरात
आता नव्या प्रकरणात किडनी तस्कर टोळीकडून वृत्तपत्रात किडनी विक्रीसाठी थेट जाहिरात दिली जात होती. यात किडन दान करणाऱ्या व्यक्तीस ३ लाख रुपये दिले जातील अशी ऑफर दिली जात होती. याच जाहिरातीची माहिती घेऊन अरुप नावाच्या व्यक्तीनं किडनी विक्रीसाठी तयारी दर्शवली. त्यासाठी ऑपरेशन देखील करण्यात आलं आणि किडनी काढण्यात आली. पण त्याला कोणतेही पैसे देण्यात आले नाहीत. ज्या मोबाइल नंबरवरुन त्यानं फोन केला होता. तो मोबाइलनंबरही नंतर बंद झाला. वृत्तपत्रातील जाहिरातीत छापण्यात आलेल्या मोबाइल नंबरवरुनच पीडितानं संपर्क साधला होता. किडनी व्यापाराच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे.