दौंड (यवत): दौंड ताालुक्यातील दापोडी येथील गुळाच्या गुऱ्हाळावर सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून गुहाळ चालकाला पकडून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली असून याप्रकरणी यवत पोलिसांनी तोतया टोळीतील एकाला अटक केली असून त्यांची स्कॉर्पिओ जीप देखील जप्त केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की , काल (दि.५) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दापोडी (ता.दौंड) येथील युवराज जिजाबा रुपनवर यांच्या गुहाळवर स्कॉर्पिओ जीप (क्र.एम.एच.४२ , ए. एस.८५५४) मधून सहा जण आले.यावेळी तेथे गुऱ्हाळ चालविणारे चालक नशीब कुरबान मलिक (वय -३२) हे होते.आलेल्या इसमांनी ते सीबीआयचे लोक असून गुळावर गुऱ्हाळा ऐवजी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली असून तुमच्याकडे चौकशी करायची आहे , असे सांगितले.याचबरोबर फिर्यादी नशीब मलिक व मोहन माणिक रुपनवर यांना ताब्यात घेत जीपमध्ये बसविले.यावेळी सदरच्या जीप नेमकी कुठे जाते आणि हे पाहण्यासाठी काही ग्रामस्थ मागे गेले असता त्यांनाही आरोपींनी गाडी रस्त्यात थांबवून मारहाण करत पाठवून दिले.यानंतर गाडी पाटस येथे घेऊन गेले , फिर्यादी नशीब मलिक यांच्याकडून कारवाई न करण्यासाठी ८० हजार रुपये व साथीदार याच्याकडून १८ हजार रुपये घेऊन त्यांना तेथेच सोडून तोतया टोळी निघून गेली.मात्र, या सर्व प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली.यावेळी गुन्ह्यात वापरलेल्या जीपच्या क्रमांकावरून जीप मालकाचा शोध घेतला.यावेळी गाडी मालक व गाडी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता सहा आरोपींनी गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली यावेळी यातील तीन आरोपींना निष्पन्न करून एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे.पोलिसांनी अवघ्या सहा तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.
सीबीआयच्या तोतया टोळीकडून गुऱ्हाळ चालकाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 18:43 IST
दौंड ताालुक्यातील दापोडी येथील गुळाच्या गुऱ्हाळावर सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून गुहाळ चालकाला पकडून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली आहे.
सीबीआयच्या तोतया टोळीकडून गुऱ्हाळ चालकाचे अपहरण
ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाखाची खंडणी घेऊन पोबारासहा तासात यवत पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा