फिरण्यासाठी गेलेल्या भावाबहिणीचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:58 IST2019-06-28T21:54:08+5:302019-06-28T21:58:36+5:30
तुळींज पोलिसांनी भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.

फिरण्यासाठी गेलेल्या भावाबहिणीचे अपहरण
नालासोपारा - पूर्वेकडील अग्रवाल नगरमध्ये राहणाऱ्या आणि भांडी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेचे मुलगा आणि मुलगी मित्रांसोबत मंगळवारी दुपारी गेले होते पण ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाही. तुळींज पोलिसांनी भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.
पूर्वेकडील अग्रवाल नगरमधील फायर ब्रिगेडजवळील श्रद्धा बिल्डिंगमधील सदनिका नंबर 1 मध्ये विद्या राजू हातांगळे (32) ही आपल्या परिवारासोबत राहत असून भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची 15 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा हे दोघे भाऊ बहीण मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नवनीत यादव आणि इमरान या मित्रमंडळीसोबत फिरण्यासाठी गेले होते. पण ते अद्याप पर्यंत घरी परतलेच नाही. आईने सगळीकडे शोध घेऊन सापडले नाही म्हणून तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन बुधवारी तक्रार दिली आहे.