शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या, शहरात खळबळ, आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:17 IST

Crime News : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राज पांडे (वय १६) नामक शाळकरी मुलाचे आरोपी संतोष शाहू याने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले. काही वेळेनंतर आरोपी शाहूने अपहृत राजच्या पालकांना फोन केला.

- नरेश डोंगरे 

नागपूर : शाळकरी मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्यांने मुलाच्या सुटकेच्या बदल्यात  नात्यातील एका व्यक्तीच्या शिराची (मुंडके) मागणी केली.  अपहरणकर्त्यांच्या या मागणीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आणि आरोपीच्या तावडीतून अपहृत मुलाची सुटका करून घेण्यासाठी  उपराजधानीतील अवघी पोलिस यंत्रणा कामाला लागली असताना अपहरणकर्त्याने त्या निष्पाप मुलाची हत्या केली. मध्यरात्री ही थरारक घडामोड उघड झाल्याने काही वेळेसाठी पोलीसही शहारले.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राज पांडे (वय १६) नामक शाळकरी मुलाचे आरोपी संतोष शाहू याने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले. काही वेळेनंतर आरोपी शाहूने अपहृत राजच्या पालकांना फोन केला. 'तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, त्यांची सुखरूप सुटका करायची असेल तर राजच्या काकांचे शीर कापून मोबाईलवर फोटो पाठवा', अशी भयंकर मागणी अपहरणकर्त्यां शाहूने राजच्या पालकांकडे केली. ही मागणी इतकी भयावह होती की, पालकांना दुसरा पर्यायच उरला नाही. सुन्न पडलेल्या पालकांनी एमआयडीसी पोलिसांना ते कळविले. ही विचित्र तेवढीच भयंकर मागणी ऐकून पोलीसही हादरले. त्यांनी लगेच वरिष्ठांना कळविले. मुलाचे अपहरण आणि अपहरकर्त्याची भयंकर मागणी ऐकूनअवघी पोलीस यंत्रणाच सक्रिय झाली.पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेसह सर्वच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपहृत राज तसेच अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी कामी लावले. आरोपी शाहूचे लोकेशन वर्धा मार्गावर दिसल्यामुळे आजूबाजूच्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही यासंबंधीची माहिती देऊन आरोपी शाहू तसेच अपहृत राजच्या तपासासाठी पोलीस यंत्रणा कामी लावण्यात आली. मध्यरात्री आरोपी शाहू वर्धा मार्गावर पोलिसांच्या हाती लागला.

खेळ संपलानराधम शाहूचे कपडे अन एकूणच त्याची अवस्था पोलिसांची धडकी वाढवणारी होती. त्याला खाक्या दाखविताच त्याने राजच्या हत्येची कबुली दिली. नंतर त्याने पोलिसांना घटनास्थळ दाखवले.

काळजाचा ठोका चुकलानिरागस राज वंजारी कॉलेज परिसरातील निर्जन ठिकाणी मृतावस्थेत पडून दिसल्याने पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला. पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस पहाटेपर्यंत काम करत होते. आरोपीलाही विचारपूस केली जात होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर