मामाकडे अकोल्यात आलेल्या जळगाव येथील युवतीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:37 IST2021-07-24T10:37:11+5:302021-07-24T10:37:21+5:30

Kidnapping Case : १७ वर्षीय युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना डाबकी रोड येथे २२ जुलै रोजी उघडकीस आली.

kidnapped a young woman from Jalgaon who came to Akola | मामाकडे अकोल्यात आलेल्या जळगाव येथील युवतीला पळविले

मामाकडे अकोल्यात आलेल्या जळगाव येथील युवतीला पळविले

अकोला : जळगाव येथील रहिवासी मुलगी अकोल्यातील डाबकी रोडवर रहिवासी असलेल्या मामाकडे आल्यानंतर १७ वर्षीय युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना डाबकी रोड येथे २२ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव येथील एक १७ वर्षीय व दुसरी १४ वर्षीय अशा दोघी बहीणी तिच्या आजी-आजोबाकडे डाबकी रोड येथे १२ जुलै रोजी आल्या होत्या. २१ जुलै रोजी दुपारी लहान बहीण झोपलेली होती. काही वेळाने तिची आजी घरी आली असता तिने लहान नातीला मोठी बहीण कुठे गेली, अशी विचारणा केली असता लहान बहिणीने माहिती नसल्याचे आजीला सांगितले. त्यामुळे या युवतीच्या परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती दिसून आली नाही. अखेर युवतीच्या आजाेबाने डाबकी रोड पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या नातीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. डबकी रोड पोलीस युवतीचा शोध घेत आहेत.

Web Title: kidnapped a young woman from Jalgaon who came to Akola