हद्दपारप्रकरणी खानला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:16 IST2019-05-14T12:15:55+5:302019-05-14T12:16:48+5:30
मुंब्रा पोलिसांनी केली कारवाई

हद्दपारप्रकरणी खानला अटक
ठाणे - ठाणे शहर पोलिसांनी दोन वर्षांसाठी ठाणे जिल्ह्याचे महसुली हद्दीतून हद्दपार केलेल्या आरिफ मोहम्मद मोहसिन खान (26) याला मुंब्रा पोलिसांनी मुंब्र्यातून 13 मे रोजी रात्री अटक केली. आरिफला 2018 रोजी हद्दपार केले असताना ते आदेश भंग करुन विनापरवाना प्रवेश करुन लपून छपुन फिरताना तो मिळून आला. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.