लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी चोरली बस, चार जिल्हे पारही केले पण गावी पोहोचू शकला नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:08 PM2021-05-12T13:08:22+5:302021-05-12T13:13:58+5:30

लॉकडाऊनमध्ये परिवारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीच मिळालं नाही म्हणून ३० वर्षीय व्यक्तीने थेट बस चोरी केली. मात्र, दुर्दैवाने आपल्या गावात पोहोचण्याआधीच त्याला पोलिसांनी अटक केली.

Kerala man steals bus to be with his wife and child arrested by police | लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी चोरली बस, चार जिल्हे पारही केले पण गावी पोहोचू शकला नाही....

लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी चोरली बस, चार जिल्हे पारही केले पण गावी पोहोचू शकला नाही....

Next

(छायाचित्र - प्रातिनिधीक)

अनेक ठिकाणी अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक अडकून पडले आहेत. ते त्यांच्या परिवारापासून दूर आहेत. अशा स्थितीत त्यांना परिवाराकडे परत जाण्याची ओढ आहे. पण काहीच साधनं नसल्याने लोक वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. आता हेच बघा ना....लॉकडाऊनमध्ये परिवारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीच मिळालं नाही म्हणून ३० वर्षीय व्यक्तीने थेट बस चोरी केली. मात्र, दुर्दैवाने आपल्या गावात पोहोचण्याआधीच त्याला  पोलिसांनी अटक केली आणि त्याचा प्लॅन उधळून लावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनूप नावाच्या व्यक्तीने शनिवारी रात्री तिरूवनंतपुरमच्या कोझीकोडमध्ये बस स्थानकातून एक प्रायव्हेट बस चोरी केली. तो आपल्या गावाकडे जाण्यासाठी बसने निघाला. पण रविवारी सकाळी कुमारकोम भागात तो पोलिसांच्या तावडीत सापडला. नंतर त्याला पोलिसांनी तुरूंगात कैद केलं. (हे पण वाचा : हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...)

दिनूपने पोलिसांना सांगितले की, तो पथनमथिट्टा जिल्ह्यातील तिरूवलामध्ये राहत असलेल्या पत्नी आणि मुलांना भेटायला जायचं होतं. पण लॉकडाऊनमुळे कोझीकोडपासून २७० किलोमीटर दूर तिरूवलाला पोहोचू शकत नव्हता. त्याला कुट्टियाडी पोलीस स्टेशनच्या भागात एक प्रायव्हेट बस दिसली. या बसमध्ये कुणीच नव्हतं.

दिनूप बसमध्ये चढला आणि त्याने कशीतरी बस सुरू केली. बसमध्ये डीझल फुल होतं. त्यामुळे तो घराकडे जाण्यासाठी आनंदाने निघाला. रात्री दोन ठिकाणी त्याला पोलिसांनी अडवलं. तर त्याने सांगितलं की, तो पथनमथिट्टाहून मजुरांना आणायला जात आहे. पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला जाऊ दिलं. (हे पण वाचा : Viral : लॉकडाऊनमध्ये नवं जोडपं बुलेटवर फिरायला निघालं; पोलिसांनी अडवताच झालं असं काही..., पाहा व्हिडीओ)

कोझीकोडहून तो मलप्पुरम त्रिशूर, एर्नाकुलम पार करून गेला. त्यानंतर तो कोट्टायम जिल्ह्यात पोहोचला. पण जसा तो प्रसिद्ध कुमारकोममध्ये शिरला पोलिसांनी त्याला धरलं. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुट्टियाडीहून आलेले पोलीस दिनूप आणि बस दोन्ही घेऊन गेले.
 

Web Title: Kerala man steals bus to be with his wife and child arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app