फेसबुकवर मैत्री करून शारीरिक संबंध ठेवले; युवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 23:08 IST2020-08-22T23:08:06+5:302020-08-22T23:08:37+5:30
माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत संबंधित तरुणीशी जवळीक निर्माण केली.

फेसबुकवर मैत्री करून शारीरिक संबंध ठेवले; युवकावर गुन्हा दाखल
बारामती : महाविद्यालयीन विद्यार्थिनी शी फेसबुकवर मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध केल्याप्रकरणी बाबुर्डी (ता बारामती )येथील युवकावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम दिलीप खोरे या तरुणावर वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून तरुणीशी त्याने शारीरिक संबंध ठेवले होते. ही विद्यार्थिनी सुपा (ता. बारामती) येथे शिक्षण घेत असताना शुभम खोरे याने फेसबुकद्वारे मैत्री केली.माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत संबंधित तरुणीशी जवळीक निर्माण केली .त्यानंतर आरोपी शरीरसुखाची मागणी करत होता. सुपा येथून पुढील शिक्षणासाठी ही तरुणी २०१८ मध्ये बारामती येथे गेली. यावेळी शिक्षण घेत असताना बारामती येथील लॉजवर नेत तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवले .फिर्यादीने लग्न करण्याची मागणी केली असता आरोपीने नकार दिला. काय करायचे ते कर अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .
या संबंधीत प्रकरणी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सन २०१७ते ८ जुलै २०२० दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे .