दादरमध्ये डॉक्टरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 14:05 IST2019-06-17T14:03:32+5:302019-06-17T14:05:03+5:30
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दादरमध्ये डॉक्टरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
मुंबई - दादर येथील बाल गोविंददास रोडवरील कोहिनूर टॉवरच्या टेरेसवरून उडी मारून एका २१ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. ओंकार महेश ठाकूर (२१) असं या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल मध्यरात्री ३. ३० वाजताच्या सुमारास ओंकार या मुलाने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ओंकार हा कोहिनूर टॉवरमध्ये ए विंगमध्ये राहत होता. ओंकारने राहत्या इमारतीच्या टेरेसमध्ये उडी मारून आत्महत्या केल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोचले आणि जखमी ओंकारला तात्काळ सायन रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी तपासून दाखलपूर्व मृत घोषित केले. ओंकार हा केईएम रुग्णालयात फिजिओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. पोलीस ओंकारने आत्महत्या का केली याचे कारण शोधत असून सध्या अपमृत्यूची नोंद केली आहे.
मुंबई - दादर येथे २१ वर्षीय मुलाने टेरेसवरून उडी मारून केली आत्महत्या https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2019