KDMC engineer deadly attack | केडीएमसीच्या अभियंत्यावर प्राणघातक हल्ला 
केडीएमसीच्या अभियंत्यावर प्राणघातक हल्ला 

कल्याण - केडीएमसीचे डोंबिवलीतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास येथील स्कायवॉकवर तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. हल्ला करणारे तोंडावर रुमाल बांधून आले होते. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात पाटील यांच्या पोटावर आणि छातीवर वार झाले असून त्यांना उपचारार्थ  पूर्वकडील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.


Web Title: KDMC engineer deadly attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.