कौशांबी: उत्तर प्रदेशातील कौशांबीत अशी बातमी समोर आली आहे की, पती-पत्नी यांच्यातील घडलेली अमानुष घटना आहे. एखादी व्यक्ती नशेच्या स्थितीत कोणत्या ठरला जाऊ शकते हे या घटनेवरून समजते. कौशांबी कोतवालीमधील कायपूर गावात एका महिलेने आपल्या पतीवर नशेत अमानुष मारहाण करून झाडीत फेकल्याचा आरोप केला आहे.गेल्या रविवारी संध्याकाळी तिचा नवरा नशेत होता आणि तिच्यावर निर्दयपणे मारहाण केली, असे पीडित महिलेने सांगितले. इतकेच नाही तर पतीने तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. यानंतर त्याने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याला जेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे वाटले तेव्हा त्याने तिच्या तोंडात एक कपडा कोंबला आणि गावच्याबाहेर झुडपात तिला फेकले.दुसर्या दिवशी जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा ती तिच्या माहेरी पोहोचली आणि कुटुंबीयांना हकीकत सांगितली. पोलिसांनी जखमी महिलेस जवळच्या रूग्णालयात दाखल करून आरोपी पतीसह ३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू केली आहे. आरोपीचा मेव्हणे आणि सासरा यांचा देखील समावेश आहे. मात्र, तक्रारीनंतरही पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्याचा महिलेचा आरोप आहे, अशी माहिती झी न्यूजने दिली आहे.
नशेत पत्नीला निर्वस्त्र करत जन्मोजन्मीच्याच जोडीदारानं केलं घृणास्पद कृत्य...
By पूनम अपराज | Updated: February 23, 2021 21:38 IST
Drunken husband brutally beaten wife :कौशांबी कोतवालीमधील कायपूर गावात एका महिलेने आपल्या पतीवर नशेत अमानुष मारहाण करून झाडीत फेकल्याचा आरोप केला आहे.
नशेत पत्नीला निर्वस्त्र करत जन्मोजन्मीच्याच जोडीदारानं केलं घृणास्पद कृत्य...
ठळक मुद्देत्याने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याला जेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे वाटले तेव्हा त्याने तिच्या तोंडात एक कपडा कोंबला आणि गावच्याबाहेर झुडपात तिला फेकले.